पुणे मार्केट यार्डात मिळणार दहा रुपयात जेवण; ओसवाल बंधू समाज आणि चेंबरचा उपक्रम

नाममात्र दरात थाळी सुरू करून खऱ्या अर्थाने गोरगरीब लोकांना फायदा होणार आहे.
मोफत भोजन वाटपाचा स्तुत्य उपक्रम
मोफत भोजन वाटपाचा स्तुत्य उपक्रम
Updated on

पुणे : काळाची गरज लक्षात घेऊन १० रुपयात जेवण हा चांगला उपक्रम ओसवाल बंधू समाज आणि चेंबरने हाती घेतला आहे. नाममात्र दरात थाळी सुरू करून खऱ्या अर्थाने गोरगरीब लोकांना फायदा होणार आहे. शनिवार आणि रविवार शहरात विकेंड लॉकडाऊन आहे. या काळात अनेकांना जेवण मिळत नाही. या दोन दिवशी जास्तीत जास्तीत लोकांना जेवण पोहोचवण्याचे काम करावे, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी व्यक्त केले.

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ओसवाल बंधू समाजतर्फे आणि दि पूना मर्चंट चेंबरच्या सहकार्याने 15 एप्रिल ते 1 मे 2021 पर्यंत 10 रुपयात अत्यल्प दरात सात्विक भोजनच्या उपक्रमाचे उद्घाटन मधुकांत गरड यांच्या हस्ते गुरूवारी झाले. यावेळी ते बोलत होते. या योजनेची संकल्पना ओसवाल बंधू समाजचे अध्यक्ष वालचंद संचेती आणि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांची आहे.

मोफत भोजन वाटपाचा स्तुत्य उपक्रम
पुणे : रेमडेसिव्हिरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या

चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, नगरसेवक प्रवीण चोरबोले, जवाहरलाल बोथरा, बाळासाहेब कर्नावट, फुलचंद बाठिया, प्रमोद बाफना, हरकचंद गुंदेचा, विजयराज रांका, संजय गुंदेचा, सुभाष तालेरा, प्रदीप मुथा , दीपेश संचेती उपस्थित होते. या उपक्रमाव्दारे बाहेरगावाहून येणाऱ्या ग्राहक, हमाल मालट्रक घेऊन येणारे ड्रायव्हर, कामगार, मदतनीस या घटकांना दोन वेळेस संपूर्ण जेवणाचे पाकीट १० रुपयात देण्यात येणार आहे.

या ठिकाणी आहे भोजन केंद्र

दि पूना मर्चंट चेंबर व्यापार भवन गुलटेकडी मार्केट यार्ड आणि वर्धमान सांस्कृतिक केंद्र, बिबवेवाडी कोंढवा रोड बिबवेवाडी येथे सकाळी 12 ते 1 व संध्याकाळी 5 ते 6.30 या वेळेत भोजन मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.