‘मोरया’मध्ये जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार

मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जाणार
 महात्मा फुले जनआरोग्य योजना
महात्मा फुले जनआरोग्य योजना sakal
Updated on

धायरी : सिंहगड रस्त्यावरील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जाणार आहेत. या योजनांची घोषणा आणि डायलेसिस युनिटचे उद्‍घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले.

 महात्मा फुले जनआरोग्य योजना
२५ महिला बचत गटांची पुरग्रस्थांना मदत

या वेळी सुळे म्हणाल्या, ‘आपण आत्मचिंतन करून खरंच कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे याची जाणीव कोविडने करून दिली. गेले दीड वर्ष सर्व मतभेद विसरून कोणताही पक्षपात न करता डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, नागरिक तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी कोविड योद्धा म्हणून जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे.’

 महात्मा फुले जनआरोग्य योजना
आम्ही लोकशाही पध्दतीने आंदोलन करतो

मोरया हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजितसिंह पाटील म्हणाले, ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी बऱ्याच जणांना माहिती नसते. त्यामुळे अनेकदा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या ३४ निवडक विशेष सेवांतर्गत ९९६ प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि १२१ शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा मोफत लाभ घेऊ शकतात. यात कोरोनावरील उपचारांचाही समावेश आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते.’

 महात्मा फुले जनआरोग्य योजना
निमिषा झा, अमरेश मिश्रा यांना ब्रिटनची चेव्हनींग शिष्यवृत्ती जाहीर

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुरेश गुजर, कुमार दादा, त्रंबक मोकाशी, काका चव्हाण, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे, डॉ. सुनिल जगताप व मेजर गजानन पाटील, डॉ. मोनाली पाटील, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.