शिक्षक , विद्यार्थी व पालकांसाठी उद्या मोफत वेबिनार

Sakal
SakalSakal
Updated on

पुणे : शारीरिक व्यायाम , कवायती व विविध प्रकारचे खेळ आणि क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून मानसिक ताण - तणाव दूर करता येतो तसेच मानसिक ताण - तणावाच्या समायोजनासाठी खेळ व शारीरिक व्यायाम हे प्रभावी माध्यम आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थी वर्गांसाठी मानसिक आरोग्य आणि एकाग्रतेसाठी विविध प्रकारचे खेळ व व्यायाम महत्वाचे व आवश्यक आहेत. हे ओळखून सकाळ माध्यम समूहातील "सकाळ सोशल फाउंडेशन" च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या we are in this together या मोहिमेअंतर्गत व हॉर्लिक्स यांच्या सहकार्याने उद्या शनिवार ता. (१९) जून रोजी , दुपारी बारा वाजता भारतीय आयर्नमॅन ट्रायथलीट्स कौस्तुभ राडकर यांचा "मानिसक आरोग्य , एकाग्रता आणि खेळांचे महत्व" याविषयी शिक्षक , विद्यार्थी व पालकांसाठी मोफत मार्गदर्शनपर झूम वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.

कौस्तुभ राडकर हे भारतीय जलतरणपटू व ट्रायथलीट्स आहेत. राडकर यांनी २०२० पर्यंत २५ वेळा आयर्नमॅन ट्रायथलॉन शर्यत पूर्ण केली आहे. २०१७ मध्ये कोना येथे संपन्न झालेली आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय आहेत.

असे व्हा सहभागी :

हा वेबिनार सर्व वयोगटातील नागरिकांसाठी तसेच खेळाडू व खेळप्रेमींसाठी मोफत आहे. या वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेला QR कोड स्कॅन करून किंवा खालील लिंक ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता. वेबिनार साठी ज्यांनी - ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांच्या ईमेल आयडीवर झूम वेबिनार ची लिंक व पासवर्ड पाठविण्यात येईल. सहभागासाठी लिंक :- www.waitt.in/register-now/.

QR code
QR codesakal

"सकाळ सोशल फाउंडेशन" च्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर we are in this together या मोहिमेअंतर्गत मानसिक ताण - तणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी व समुपदेशनासाठी चोवीस तास मोफत हेल्पलाईन मागील वर्षी तीन ऑगस्ट पासून राज्यभर सुरु केली असून, या हेल्पलाइनवर गेल्या दहा महिन्यांत राज्यभरातून सुमारे आठ हजार हुन अधिक लोकांनी विविध मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी मुक्त सवांद साधला आहे.

तसेच मागील वर्षभरात we are in this together या मोहिमेच्या अनुषंगाने आणि हेल्पलाईनशी निगडित विविध क्षेत्रातील प्रसिद्ध मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनपर ऑनलाईन कार्यशाळांचे आयोजन गेले वर्षभर करण्यात आले आहे. यामध्ये गायक - संगीतकार राहुल देशपांडे , महेश काळे , योगगुरू रामदेवबाबा , सिस्टर बीके शिवानी , प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे , बुद्धिबळपटू अभिजित कुंटे , क्रीडा मानसतज्ञ गायत्री वर्तक , बालमानसतज्ञ डॉ. यज्योती सिंग , विपश्यना प्रशिक्षक डॉ. निखिल मेहता , अस्थिविकार तज्ञ डॉ. शरद हर्डीकर यांच्या मार्गदर्शनपर ऑनलाईन कार्यशाळांचा राज्यभरातून विविध वयोगटातील जवळपास साडे सहा हजार हुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे.

मानसिक समुपदेशनासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट :

काही लोकांना सातत्याने समुपदेशनाची आवश्यकता असते. तर काही लोकांना प्रत्यक्ष भेटून समुपदेशन करण्याची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेऊन चिंता , काळजी , एकटेपणा यामुळे येणारा मानसिक ताण तसेच नैराश्य यामुळे उद्भवणाऱ्या मानसिक समस्या यांवर सर्व वयोगटातील नागरिकांसाठी नाममात्र सशुल्क दरात तज्ञ समुपदेशकांचे मार्गदर्शन घेण्याकरीता we are in this together या वेबसाईट द्वारे ऑनलाईन अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. we are in this together या वेबसाईटद्वारे आपल्या सोयीनुसार , वेळेनुसार व आपल्या समस्येनुसार तज्ञ समुपदेशकांची अपॉइंटमेंट नागरिकांना बुक करता येईल.

असे करा समुपदेशनासाठी ऑनलाईन बुकींग -

https://www.waitt.in/therapy/ ही लिंक ओपन करून आपली व्यक्तिगत माहिती भरून , आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडून आपण अपॉईंटमेंट बुक करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.