भुकूम ता. 2 : घोटावडे येथील आमलेवाडी ( ता. मुळशी) येथे मित्रांच्या वाद मिटविण्यातून झालेल्या मारामारीत एकाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाद मिटवण्याचा प्रयत्न करणारा मित्राला मित्रांनीच संपवीले. रविवारी रात्री ही घटना घडली. .याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओंकार भालचंद्र भिंगारे रा. ( वय 25 ), उरवडे ( ता. मुळशी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुख्य आरोपी गणेश भंडलकर व सात साथीदारांनी ( सर्व रा. उरवडे ) यांनी हा खून केला. उरवडे येथील एक फार्म हाऊसवर त्यांचा मित्र आकाश येणपूरे याच्या वाढदिवसानिमित्त आठरा जुलै रोजी जमले होते. त्यावेळी भंडलकर व अविनाश चव्हाण ( चिलापे) यांच्यात वाद झाला. चिलापेला खुनाची धमकी भंडलकरने दिली. यावेळी ओंकार भिंगारे मध्यस्ती करत होता. त्याचा राग गणेशला आला. त्या सर्वांचा मित्र अविनाश आमले रा. आमलेवाडी याला हे समजले. त्याने हा वाद मिटवा यासाठी पुढाकार घेतला. .Ladki Bahin Yojana : अजूनही लाडक्या बहिणीचा अर्ज भरलेला नाही? मुदत संपण्यापूर्वी येणार आनंदाची बातमी, काय आहे नवी अपडेट.त्याने रविवारी घोटावडे येथे सायंकाळी सर्वांनी भेटावयाचे ठरले. त्यावेळी भिंगारे एका मित्राला घेऊन घोटावडेतील हनुमान चौकात आला. तेथे आकाश येणपूरे व अविनाश आमले यांना बोलवले. त्यावेळी ओंकार जाधव, गणेश भंडलकर आले. सर्वजण आमले याच्या आमलेवाडीतील घरी जाऊन चहा पाणी घेत हा वाद मिटवण्याचे ठरविले. लहानपणापासून एकाच गावात व शाळेपासून मैत्री असलेले सर्वजण होते. वाद मिटविण्याच्या चर्चेसाठी घोटावडेवरून मुगावडे मार्गे पौडकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळील टेकडीच्या पायथ्याशी सर्वजण बसले. दरम्यान गणेश भंडलकरने इतर चार पाच जणांना आगोदरच तयारीत बोलवले होते. ते तेथील झुडपा मागे लपले होते. मिटविण्याची चर्चा सुरू झाल्यावर वाद सुरू झाला. मारामारी सुरू झाली. त्यावेळी ओंकार जाधवने लपलेल्या मित्रांना बोलवले. त्यावेळेस ओंकार भिंगारे पळू लागला. त्याचा पाठलाग करून भंडलकरने पकडले. डोक्यात कोयता घालून पाडले. दगड व काट्यांनी ठेचून ओंकार भिंगारेचा खून करण्यात आला. एकून आठ आरोपी असून सर्वजण फरार आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम करत आहे. .Dharur Fort Wall Collapsed : सात कोटी पाण्यात! बीडमधील धारूर किल्ल्याची भिंत पुन्हा ढासळली; 'हा' ऐतिहासिक ठेवा धोक्यात.यावेळी उप पोलीस अधीक्षक सुनिल कुमार पुजारी, पोलीस निरीक्षक संतोष गिरगोसावी, उपनिरीक्षक योगेश जाधव, नितीन रावते, दिपक पालखे, रवी नागटिळक, दत्ता आर्जून, रॉकी देवकाते पोलिसांनीघटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके केली असून लवकरच आरोपींना अटक करू असे पोलिसांनी सांगितले. फरारी ओरोपींना लवकर अटक करावी अशी मागणी शिवसेनेचे ( उबाठा ) भोर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रकाश भेगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.