जुन्नर - श्री तुळजा भवानीमातेच्या श्रमनिद्रेसाठी तुळजापूर येथे जाणाऱ्या मातेच्या पलंगाचे आज बुधवार (ता.१८) रोजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भंडारा- खोबऱ्याची उधळण करत प्रस्थान झाले.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथून श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे सोमवारी (ता. ०९) रोजी जुन्नरला आगमन झाले. मातेच्या पलंग व पालखीची शहरातून वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. मंगळवारी (ता. १०) रोजी श्री तुळजाभवानी मातेची पलंगावर विधिवत स्थापना करण्यात आली. जुन्नरला तिळवण तेली समाज कार्यालयात पलंगाचे आठ दिवस वास्तव्य होते. या काळात भाविकांची दर्शनासाठी दररोज मोठी गर्दी होती.