पुणे - दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) ने उद्योग जगतात मागील २० वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता देशातील प्रत्येक गावात आणि पूर्वोत्तर आदिवासी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी ‘डिक्की’ने पुढाकार घ्यावा. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अल्पसंख्याक व संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी दिले.
पुण्यात ‘डिक्की’तर्फे सोमवारी (ता. ७) आयोजित परिषदेत रिजिजू यांनी दलित उद्योजकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्या सामाजिक कार्याबरोबरच त्यांचे अर्थशास्त्रीय धोरणही सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. ‘डिक्की’ने दलित उद्योजक घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.’
प्रारंभी ‘डिक्की’च्या वतीने संस्थापक मिलिंद कांबळे यांनी किरेन रिजीजू यांचे स्वागत केले. भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन रिजिजू यांचा सत्कार करण्यात आला. कांबळे यांनी ‘डिक्की’च्या वतीने सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली.
माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, ‘डिक्की’चे सल्लागार सचिन वाणी, पश्चिम भारताचे अध्यक्ष अविनाश जगताप, महिला समन्वयक सीमा कांबळे, शहराध्यक्ष ललित बनसोड यांच्यासह प्रमुख दलित उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन मैत्रेयी कांबळे यांनी केले, तर बनसोड यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.