मंचर : “आरोग्य क्षेत्रातील तज्ञांच्या अंदाजानुसार कोरोनाची(corona) तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचारासाठी ग्रामीण भागात तालुका स्तरावर राज्यात प्रथमच अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे जम्बो ( Jumbo Covid) कोविड सेंटर उभारणीस २४ कोटी २४ लाख ४६ हजार ८६९ रुपये निधीला राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. (the first jumbo covid centre in rural areas of state of the state will start Avasari Khurd)
या कोविड सेंटरचा उपयोग आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यातील जनतेला होणार आहे. युद्धपातळीवर २० ते २५ दिवसात कोविड सेंटर सुरु करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर (ता.आंबेगाव) येथे शरद बँकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले “ नजीकच्या काळात लहान मुले बाधीत होण्याचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे अवसरी खुर्द येथील तंत्र निकेतन महाविद्यालय मुलींच्या दोन वसतीगृहामध्ये २८८ बेडचे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभे केले जाईल. त्यामध्ये २४0 ऑक्सिजन बेड, ४८ आयसीयू बेड, ४0 व्हेंटिलेटर व लहान मूलांच्या उपचारासाठी बालरोगतज्ञ उपलब्ध असतील. या सुविधेसह हॉस्पिटल सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर कामकाज करण्यासाठी प्रशासनास सुचना दिलेल्या आहेत.
“जम्बो कोविड सेंटरसाठी CSR फंडातून ९४ लाख ६५ हजार ९०० रुपये व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ११ कोटी साठ लाख चार हजार रुपये अनुदान उपलब्ध होणार आहे. परिसरातील ब-याच दानशुर व्यक्तींमार्फत ३४ व्हेंटिलेटर व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध झाले आहे. रूग्णालय चालू झाल्यानंतर चांगल्या सुविधा देण्यासाठी अन्य दानशूर व प्रतिष्ठीत नागरिक व गावे यांनी पुढे येऊन आवश्यक त्या स्वरूपात मदतीचा हात दिला पाहीजे.”
- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री.
• राज्यातील पहिले तालुका स्तरावरील जम्बो कोविड सेंटर
• एकूण २८८ बेड
• २४0 ऑक्सीजन बेड
• ४८ आयसीयू बेड
• ४0 व्हेंटिलेटर
• लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.