फुरसुंगी-उरुळी देवाची मध्ये प्लॉगेथॉन फेरी संपन्न

चालता चालता कचरा गोळा करणे या संकल्पनेवर आधारित
 चालता चालता कचरा गोळा करणे या संकल्पनेवर आधारित
चालता चालता कचरा गोळा करणे या संकल्पनेवर आधारितsakal
Updated on

फुरसुंगी : पुणे महानगरपालिका आयोजीत प्लॉगेथॉन फेरी फुरसुंगी आणि उरुळी देवाचीमध्ये घेण्यात आली. चालता चालता कचरा गोळा करणे या संकल्पनेवर आधारित या फेरीसाठी फुरसुंगीतील भेकराईनगर आरोग्य कोठी ते आठवले शाळा इथपर्यंतचा भाग निवडण्यात आला, असे आरोग्य निरिक्षक नवनाथ शेलार यांनी सांगितले. अभिनेते शंकर जाधव ( जु.दादा कोंडके) यांनी दादा कोंडकेच्या वेशभूषेमध्ये उपस्थित राहून जनजागृतीमध्ये हातभार लावला. सुट्टीचा दिवस आणि सकाळची वेळ असल्याने नागरिकांना यामध्ये सहभागी होता आले. यावेळी नगरसेवक गणेश ढोरे,शंकर हरपळे,दत्ता राऊत,रोहिणी राऊत,रामभाऊ होले,वरिष्ठ आरोग्य निरिक्षक मंगलदास माने आणि इतर महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

 चालता चालता कचरा गोळा करणे या संकल्पनेवर आधारित
उंड्री : हांडेवाडी रोडवरील वाहतूक कोंडीने वाहनचालकांची घुसमट

उरुळी देवाची मध्ये यासाठी उरुळी देवाची फाटा येथून सुरुवात होऊन आंबेडकर चौक पर्यंत हा दोन की.मी.चा टप्पा निवडण्यात आला, असे येथील आरोग्य निरिक्षक सचिन लडकत यांनी सांगितले.सहभागी नागरिकांनी फेरीमध्ये चालताना दिसणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या, कागद आणि सुका कचरा गोळा करून योग्य ठिकाणी जमा केला.फेरीची सांगता करताना महापालिका कर्मचारयांसोबतच सर्व सहभागी नागरिकांनकडून 'मी माझा परिसर स्वछ ठेवेन' अशी शपथ घेण्यात आली. याप्रसंगी विकास सकट, दिलीप भाडळे, पांडुरंग रोडे,वैशाली पवार, अनिरुद्ध पाचपुते, राजेंद्र पवार, रेखा सातव, पांडुरंग गोरे, अर्चना चव्हाण उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()