G20 : ‘जी २०’ परिषद : उद्यान विभागाच्या निविदेवर प्रशासनाची सावध भूमिका

झाडाच्या किमती अवास्तव आहेत की नाही याची तपासणी करून त्यास किमती चुकीच्या असतील तर निविदा रद्द
G20' Council Administration cautious stance on park department tender pune
G20' Council Administration cautious stance on park department tender punesakal
Updated on

पुणे : ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने उद्यान विभागाने सुशोभीकरणासाठी अव्वाच्या सव्वा दराने झुडूप प्रकारातील झाडांची खरेदी सुरू केल्याचे चव्हाट्यावर आल्याने आज महापालिका प्रशासनाने यावर सावध भूमिका घेतली.

G20' Council Administration cautious stance on park department tender pune
Pune Lok Sabha Election : मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर; पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ

झाडाच्या किमती अवास्तव आहेत की नाही याची तपासणी करून त्यास किमती चुकीच्या असतील तर निविदा रद्द केल्या जातील असे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. शहरात १२ ते १४ जून आणि १९ ते २२ जून अशा दोन टप्प्यांत ‘जी २०’ परिषदेच्या बैठका होणार आहेत.

त्यासाठी रस्ते सुशोभीकरणासाठी १ कोटींची झाडे आणि कुंड्या खरेदी केली जाणार आहेत. तर पाच रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी खर्च केला जाणार आहे. दुभाजकाच्या मध्यभागी फ्लॉवर बेड करणे, झाडांचे ट्रीमींग करणे आदी कामाचा समावेश आहे. फ्लॉवर बेडचे काम १६ जूनपासून सुरू होणार आहे.

G20' Council Administration cautious stance on park department tender pune
Pune News : महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी केल्या २५८ मिळकती सील

तसेच उड्डाणपुलावर कुंड्यांमध्ये बोगम वेल, रॅफिस प्लाम, फिक्स स्टार लाइट, फिक्स ब्लॅक अ‍ॅरका प्लॉम ही झुडूप प्रकारातील झाडे आहेत. त्याची किंमत १२०० रुपयांपासून ५ हजार रुपये प्रति झाड आहे, त्यांच्यासाठी कुंड्यांचा खर्च स्वतंत्र केला जाणार आहे. राज्य सरकारने जी २० साठी निधी दिली असला तरी त्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले जात नसल्याने उधळपट्टीच होत आहे. त्यावर आता आयुक्तांनी किमती अयोग्य असतील तर निविदा रद्द करू असे सांगितले आहे.

‘‘ शहरातील व्हीआयपी रस्ते कायमस्वरूपी चांगले दिसावेत यासाठी सुशोभीकरण करण्यात येत आहे. मोठ्या कुंड्या आणि त्यामधील झाडांच्या दराबाबत आणि त्यांची उपयोगिता याची माहिती घेऊ. जर किमती जास्त असतील तर निविदा रद्द केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांची याच्या सूचना दिल्या आहेत.’’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.