Pune : शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता, संख्याशास्त्राची ओळख आणि उपाययोजना करणे गरजेचे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-२० शिक्षण कार्यगटाच्या ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची शाश्वती’ या विषयावरील चर्चासत्राचे आज उद्घाटन झाले.
G-20 Digital Economy
G-20 Digital Economysakal
Updated on

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीनिमित्त ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची शाश्वती’ या विषयावरील चर्चासत्राचे सोमवारी उद्घाटन झाले. केंद्रीय शिक्षण व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंग आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क सुकाणू समितीचे सदस्य प्रा.मंजुल भार्गव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव संजय मूर्ती, केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, केंद्रीय कौशल्य विकास सचिव अतुल कुमार, युनिसेफचे चिफ ऑफ एज्युकेशन टेरी डर्नीअन, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.सुरेश गोसावी उपस्थित होते.

यावेळी रंजन सिंग म्हणले, ‘‘लिहिण्याची-वाचण्याची क्षमता आणि अंकाद्वारे मूलभूत व्यवहार करणे हा भविष्यातील शालेय शिक्षणासाठी आणि जीवन विकासासाठी आवश्यक पाया आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणे आणि त्यासाठी स्पष्ट उद्देश समोर ठेवून तातडीने उपाययोजना करणे काळाची गरज आहे.’’

G-20 Digital Economy
Sakal Vidya Edu Expo : प्रदर्शनातून करिअरची योग्य दिशा - आयुक्त शेखर सिंह

सिंग म्हणाले....

- शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची (एफएलएन) ओळख नसल्याचे सर्वेक्षणातून समोर

-‘एफएलएन’च्यादृष्टीने मूलभूत कौशल्यावर आधारीत कृतियोजना निश्चित करण्याची गरज

- अध्ययन-अध्यापनाचा दृष्टीकोन, पालक व समाजघटकांची भूमिका, शिक्षकांची क्षमतावृद्धी आणि प्रशिक्षणावर भर

- २०२५ पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची प्राथमिक शिक्षण स्तरावर ओळख आवश्यक

G-20 Digital Economy
Pune News पुण्यातील या भागात होतेय दुरुस्त-नादुरुस्त गाड्यांचे पार्किंग

कोट

भूक आणि दारिद्र्याची समस्या दूर करण्यासाठी मुलांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. याबाबतीत मागे पडल्याने शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते. जगातील ५६ टक्के आणि युरोपासारख्या प्रगत भागातही या विषयाचे ज्ञान नसलेल्यांची संख्या १४ टक्के आहे. विद्यार्थ्यांचे योग्य अध्ययन, प्रयोगशीलता, नवनिर्मितीचे ज्ञान आणि कौशल्य विकसीत केल्यास शाश्वत विकासाचे उद्दीष्ट गाठता येईल. त्यासाठी वैशिष्ठ्यपूर्ण अभ्यासक्रमावर भर देत शिक्षकांची अध्यापन क्षमताही विकसीत करावी लागेल.

- प्रा.भार्गव म्हणाले, सदस्य, राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क सुकाणू समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.