Pune News : जी-२० शिक्षण मंत्र्यांची अंतिम बैठक गुरूवारी

जी-२० शिक्षण कार्यगटाच्या अंतिम बैठकीनंतर गुरूवारी (ता.२२) प्रत्यक्ष शिक्षण मंत्र्यांच्या बैठक पुण्यात पार पडत आहे.
G20 education minister final meeting
G20 education minister final meetingsakal
Updated on

पुणे - जी-२० शिक्षण कार्यगटाच्या अंतिम बैठकीनंतर गुरूवारी (ता.२२) प्रत्यक्ष शिक्षण मंत्र्यांच्या बैठक पुण्यात पार पडत आहे. या बैठकीत विविध देशांच्या शिक्षणमंत्र्यांसह सर्व सदस्य मंत्री हा निष्कर्ष आराखडा औपचारिक रित्या स्वीकारतील.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जी-२० शिक्षण कार्य गटाच्या चौथ्या आणि अंतिम बैठकीचे पुण्यात आयोजन केले होते. या बैठकीची बुधवारी सांगता झाली. सदस्य देशांचे सुमारे ८० प्रतिनिधी, आमंत्रित देश आणि शिक्षण कार्यगटाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, या बैठकीला उपस्थित होते.

G20 education minister final meeting
Pune Crime: पुण्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! संगणक अभियंता तरुणीवर रिक्षाचालकाकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

दोन दिवसीय बैठकीचे अध्यक्षस्थान उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव, संजय कुमार यांनी भूषवले. तर, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी पर्यायी अध्यक्ष म्हणून होते. पहिल्या दिवशी भारत सरकारच्या जी-२० अध्यक्षांचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन शृंगला हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

G20 education minister final meeting
Water Supply : खराडी भागातील एक दिवसाआड पाणी पुरवठा बंद

शिक्षण कार्यगटाच्या या चौथ्या बैठकीदरम्यान तयार झालेला निष्कर्ष आराखडा आंतरराष्ट्रीय समुदायासाठी मार्गदर्शक ठरेल. सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक आणि उच्च-गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी यातून एक निश्चित आणि योग्य दिशा मिळू शकेल.

- के संजय मूर्ती, सचिव, केंद्रीय उच्च शिक्षण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()