गढवाल, कांजीवरम, पैठणीचे आकर्षण

साड्यांच्या बाजारपेठेत यंदा उत्साह आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे व्यावसायिकांमध्ये मोठा उत्साह आहे.
Saree
SareeSakal
Updated on

स्वारगेट - दिवाळीनिमित्त साड्यांच्या बाजारपेठेत पैठणीच्या विविध प्रकारांचा बोलबाला दिसून येत आहे. दाक्षिणात्य नली सिल्क, गढवाल सिल्क, कांजीवरम, इरकल, दक्षिण सिल्क, शालू, टिशू, बनारस सिल्क, सुरत सिल्क आदी साड्यांच्या या प्रकारांनाही महिलांची मोठी मागणी आहे, असे व्यावसायिकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

साड्यांच्या बाजारपेठेत यंदा उत्साह आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे व्यावसायिकांमध्ये मोठा उत्साह आहे. पैठणीमध्ये कडीयल पैठणीला (पैठणची पैठणी) महिलांचा जास्त प्रतिसाद मिळतो आहे. या साडीचा मधला भाग आणि काठ वेगळे विणले जातात, त्यामुळे साडीचा काठ विशेषतः उठून दिसतो.

Saree
वाहतूकीत अडथळा ठरत असलेला सायकल ट्रॅक नगरसेवकाने उखडला

पैठणी साड्या या खानदानी पेहरावाचा एक भाग असल्याने या साड्यांना महिलांची मोठी मागणी असते तसेच दिसायला आकर्षक, १०० टक्के सिल्क असून ती हातमागावर विणलेली असते. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध रंगात साड्या उपलब्ध होतात. तसेच पदरावर फॅशननुसार बदल केले जातात, असे व्यावसायिकांनी सांगितले.

दोन वर्षे कोरोनामुळे साडी व्यवसायास मोठा फटका बसला होता. परंतु, यंदा महिलांचा साडी खरेदीस मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठ दिवसांपासून साडी खरेदीस गर्दी होत आहे .

- महेश यमजाल, साडी व्यावसायिक

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे, आम्ही पुन्हा पूर्वपदावर येत आहोत, ही समाधानाची बाब आहे.

- राहुल येमूल, साडी व्यावसायिक

दिवाळी आली की माझ्या तीन मुली घरी येतात आणि त्यांना न चुकता आम्ही साडी घेतो. यावेळी दोन पैठणी आणि एक कांजीवरम साड्या घेतल्या आहेत. साडी खरेदी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

- किशोरी वाघमोडे, ग्राहक

Saree
महाराष्ट्रास तातडीने लोकायुक्ता ची नियुक्ती करावी : अण्णा हजारे

असे आहेत प्रकार...

येवल्याची पैठणी : विणकाम सलग असते, ही साडी ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे पदराच्या पाठीमागच्या बाजूला तिथे एकही धागा वर आलेला नसतो.

किंमत ९ ते १३ हजार रुपये

पैठणची पैठणी (कडीयल) : कडीयल हा विणकामातला शब्द आहे. साडीमध्ये जरीची बुट्टी ही एकसंध असते.

किंमत १३ ते २२ हजार

मुनिया काठ पैठणी : बॉर्डर पूर्ण जरीत, पोपटाच्या चोचीसारखा बुट्टा असतो. तो काठात विणलेला असल्याने पैठणीला मुनिया पैठणी असे म्हणतात.

किंमत २५ ते ३५ हजार

ब्रोकेड पैठणी : काठात मोर, पोपट या डिझाइनचे विणकाम केलेले असते. पैठणी विणायला सहा ते आठ महिने लागतात. जरीकाम जास्त असल्याने ही पैठणी महागडी आहे.

किंमत ४५ ते ७५ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()