जंगी मिरवणूक भोवली, गजा मारणेसह नऊ जणांना न्यायालयीन कोठडी

Gajanan-Marane
Gajanan-Marane
Updated on

पुणे - कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याने मुंबईतील तळोजा करागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढीत शक्तीप्रदर्शन केल्या प्रकरणी त्याला व त्याच्या साथीदारांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी हा आदेश दिला. गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण होत असल्याचे लक्षात येताच पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत मारणेसह त्याच्या 200 साथीदाराविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. त्यापैकी मारणेसह 9 जणाना पोलिसांनी अटक केली, तर गुन्हा दाखल झालेल्यापैकि 27 जणाची नावे निष्पन्न झाली आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय 48), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय 36), बापु श्रीमंत बागल (वय 34), आनंता ज्ञानोबा कदम (वय 37), गणेश नामदेव हुंडारे (39), रुपेश कृष्णराव मारणे (वय 38), सुनील नामदेव बनसोडे (वय 40) श्रीकांत संभाजी पवार (वय 34) आणि सचिन आप्पा ताकवले (वय 32) यांना अटक करण्यात आली होती. 

खून प्रकरणात निर्दोष सुटका
मारणे याला दोन खून प्रकरणात 2014 मध्ये अटक झाली. त्यानंतर त्याच्यावर व त्याच्या साथीदारांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली होती. त्याला नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. दरम्यान, दोन्ही खून प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

जंगी मिरवणूक
सोमवारी सायंकाळी मारणे याची मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी त्याच्या हजारो समर्थकांनी तळोजा कारागृहासमोरच मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत आरडाओरड केला. फटाके फोडण्याबरोबरच ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरणही केले. चित्रीकरण करीतच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन 400 ते 500 अलिशान गाड्यांमधून जंगी मिरवणुक काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भातील व्हिडीओ काही वेळातच सोशल मिडीयावर व्हायरल झाले. 

व्हिडिओ व्हायरल
मारणे निर्दोष सुटलेल्यानंतर 500 वाहनांसह शक्तिप्रदर्शन करून त्याचे व्हिडिओ क्लिप व्हायरल केले. एवढ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा आणून आरोपींचा काही कट आहे का? आरोपींनी जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. गुन्ह्यातील दोनशे ते अडीचशे साथीदार आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या तीनशे गाड्यांची माहिती काढून त्या जप्त करायच्या आहेत. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कोणी आर्थिक सहाय्य केले याचा तपास करायचा आहे. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.