Gaja Marne Pune : गजा मारणे पुणे पोलिसांच्या रडारवर, ४ तासांच्या चौकशीनंतर दिला 'दम', नेमकं प्रकरण काय?

Pune Crime: वाढत्या गुन्हेगारीच्या घटना व समाजमाध्यमांवरील चित्रफितींवरून पोलिसांनी मारणेची चौकशी
Gaja Marne
Gaja Marneesakal
Updated on

Latest Pune News: समाज माध्यमांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी फिरविल्या जात असलेल्या चित्रफिती व शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी गुंड गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याची शनिवारी चौकशी केली. पोलिसांनी समाजमाध्यमातील चित्रफिती, गंभीर गुन्ह्यात सहभागी झाल्यास कडक कारवाईचा इशारा देत गुंड गजा मारणेला पोलिस भाषेत "दम' भरला.

नाना पेठेत माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्यावर कोयत्याने वार करून व पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केल्याची घटना एक सप्टेंबरला घडली होती. या घटनेनंतर शहरात दहशत व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित खून प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत 21 जणांना अटक केली आहे.

Gaja Marne
Pune Crime : आर्थिक व्यवहारातून 2 तरुणांवर गोळीबार; कोरेगावमूळ परिसरातील इमानदारवस्ती येथील घटना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.