Latest Pune News: दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मिरवणुकीत कलावंत ढोल ताशा पथकाने पुणेकरांना मोहिनी घातली. यंदा कलावंत पथकाने आझाद व्यायाम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला..पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुका अजूनही सुरूच आहे. पुण्यातील अलका चौकातून चार ही प्रमुख रस्त्यावरून कालपासून आज 2 वाजेपर्यंत 190 सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन घाटावर गेलेत..गणेश विसर्जनावेळी कोपरखैरणे मधून ३ आणि खारघर परिसरातून अडीच टन निर्माल्य संकलन करण्यात आले. .२६ तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप सुरूच आहे. पुण्यातील अलका चौकातून केवळ १४५ मंडळ विसर्जनासाठी आतापर्यंत गेली आहेत .२५ तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू आहे. अजूनही पुण्यातील लक्ष्मी रोड, केळकर रोड, टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच आहेत. कुमठेकर रोडवरील गणपती मिरवणुका संपल्या आहेत. मिरवणूक संपण्यासाठी अजून १ ते दीड तास लागण्याची शक्यता आहे. अजूनही शहरातील रस्त्यावर डी जेचा दणदणाट सुरू आहे..24 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप सुरूच आहे. पुण्यातील अलका चौकातून केवळ 117 मंडळ विसर्जनासाठी आतापर्यंत गेली आहेत .लालबागच्या राजाच विसर्जन होणार आहे. यासाठी गिरगाव चौपाटी मोठी गर्दी झाली आहे. .पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला २३ तास पूर्ण झाले आहेत. मानाचे पाच गणपती सह प्रमुख गणपतींची विसर्जन मिरवणूका पुर्ण झाल्या आहेत. असे असुनही विसर्जन मिरवणूक सोहळा अजूनही सुरूच आहे. .मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर लवकरच लालबागच्या राजाच विसर्जन होणार आहे. .लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. .पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जनाला १९ तास पूर्ण झाले आहेत. अलका टॉकीज चौकातून डी जे लावलेले मंडळे आता विसर्जनासाठी अंतिम मार्गावर निघणार आहेत. .चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. काही वेळातच या ठिकाणा बाप्पाच विसर्जन होईल. .प्रसीद्ध उद्योजक अनंत अंबानी हे देखील लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. .कार्यकर्त्यांच्या फौजेसह आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर परिसरात दाखल झाला आहे. 18 तासांनी बाप्पाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झाली आहे. .पुण्यातील सार्वजनिक मिरवणूक दुसऱ्या दिवशी ही जल्लोषात सुरू आहे. काल संध्याकाळी मानाचे पाच गणपतींचे विसर्जन झाल्यावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन ९ वाजता संपन्न झाले. रात्री उशिरा पर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. रात्री पारंपरिक वाद्य वाजवत काही मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. ज्या गणेश मंडळांनी डी जे लावले होते ते दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळपासून पुन्हा एकदा विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. पोलिसांनी काल रात्री दिलेल्या माहितीनुसार ही विसर्जन मिरवणूक दुपारी १२ पर्यंत सुरू राहील....बेळगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार आसिफ (राजू) सेठ, अभय पाटील, महापौर सविता कांबळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आदी उपस्थित होते..पुण्यात सकाळी सहानंतर डीजेचा दणदणाट पुन्हा सुरू झाला आहे. पोलिसांच्या आदेशानंतर, रात्री १२ नंतर डीजे बंद करण्यात आला होता..मुंबईमधील लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भक्तांनी गर्दी केलीये. ही शान कोणाची लालबागच्या राजाची या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे..मुंढवा : केशवनगर मुंढवा, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, खराडी परिसरात ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला. गणपतींना भाविकांनी पारंपारिक वाद्य, ढोल-ताश्या, बॅंड पथक, टाळ-मृदंगाच्या गजरात, गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप दिला..शनिपार मित्र मंडळाचा गणपती अलका चौकातून मार्गस्थ होत आहे. कासवाची मोठी प्रतिकृती करून त्यावर गणपती बसवण्यात आला आहे..पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत असलेले डीजे बंद केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री १२ वाजता डीजे बंद करणे बंधनकारक होते. लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड रस्त्याने येणारे सर्व डीजे बंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी सूचना दिल्यानंतर गणेश मंडळाकडून डीजे बंद करण्यात आले..मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती विसर्जनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी प्रार्थना आणि आरती केली..सातारा : ‘गणपती बापा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा निघाले गावाला... चैन पडेना आम्हाला’, अशा जयघोषात फुलांची उधळण करत, पारंपरिक वाद्यांच्या निनादात, ढोल-ताशांच्या गजरात सातारा जिल्ह्यातील सुमारे 800 गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सातारा शहरातील 64 सार्वजनिक मंडळांचा त्यामध्ये समावेश आहे. तर, 26 हजार घरगुती बाप्पांनाही भक्तिभावाने निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "यंदा उत्साह खूप आहे. 10 दिवस भक्तांनी गणपती बाप्पाची सेवा केली. आज सर्वजण गणपती विसर्जनासाठी निघाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा गणपती उत्सव दुप्पट आहे. महाराष्ट्रात प्रचंड उत्साह आहे.".भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी कामवारी नदीकडे रात्री १ वाजता जात असताना अचानक मूर्तीवर दगडफेक झाली आहे. .गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान बेळगावात रात्री दीड वाजता अतिरिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..पुण्यातील गुरुदत्त मित्र मंडळ अलका चौकातून मार्गस्थ होत आहे..कराड : गणेश मूर्ती विसर्जनासाठी कराडमध्ये (Karad Ganesh Visarjan) मोठा उत्साह होता. रात्री 12 नंतर गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान पोलिसांनी (Karad Police) साऊंड सिस्टिम, वाद्य वाजवण्यास बंदी केली. एका गणेश मंडळांने रात्री बारानंतर एक तर गाणी वाजू द्या या मागणीवरून चावडी चौकातच काही काळ ठिय्या मारला होता. त्या दरम्यान कराडचे पोलीस उपाधिक्षक अमोल ठाकूर यांनी संबंधित मंडळास पुढे जाण्यास सांगितले. .कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत नागरिकांची तुफान गर्दी बघायला मिळाली. महाद्वार ते पापाची तिकटी मार्गावर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी बघायला मिळाली. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अनेकांना प्रसादही दिला..नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य 1 वाजेपर्यंत वाजविण्याची गजानन शेलार यांनी व्यासपीठावरून घोषणा केली. त्यानंतर पोलीस दलाच्या व्यासपीठासमोर डीजे बंद करण्यात आला आणि ढोल-ताशांचा गडगडाट सुरू झाला आहे..कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक रात्री 12 वाजता थांबवण्यात आली आहे..मुंबई : अग्निशमन दलाच्या ब्रिज जवळ लालबागच्या राजाला सॅल्यूट देण्यात येत आहे..गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमांच्या धिज्जा उडल्या. कोल्हापूर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जनासाठी डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घातली होती, परंतु गणेश मंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले. अनेक गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट लावण्यात आल्याचे दिसून आले..पुणे : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींना भाविकांनी जड अंतःकरणाने निरोप दिला. मानाच्या गणपतीसाठी काढण्यात आलेल्या विर्सजन मिरवणुकीत हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली. गणरायाचा जयजयकार करत भाविकांनी मानाच्या गणपतींचं विसर्जन केलं..जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये गणपती विसर्जन शोभा यात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या घरच्या गणपती विसर्जनात सहभागी झाले आहेत..कराड : गणेश मूर्ती विसर्जनासाठी कराडमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. वाद्यांच्या गजरात आणि गणपती बाप्पाच्या जय घोषात विसर्जन मिरवणुका सुरू असून कराडमधील मुख्य चावडी चौकात मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. विविध मंडळाकडून झांजपथक पारंपारिक वाद्य यांना यंदा पसंती दिल्याचे दिसत आहे. रात्री साडेदहा वाजेपर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले..जिंतूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी येथे हलवण्यात आलीये. सदरची दुर्घटना रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे..लालबागच्या राज्याची मुंबईत विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू आहे. यादरम्यान लालबागचा राजा भायखाळ्यात दाखल झाला आहे. .नाशिक महानगरपालिका अधिकारी कर्मचारी गणेशोत्सव मंडळ मनाचा गणपती विसर्जन मिरवणूक चित्ररथ क्रमांक ०१ रामकुंड पंचवटी कारंजा येथे पोचला आहे. काही क्षणात मानाच्या पहिल्या गणपती मूर्तीचे विसर्जन होणार आहे .पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडूशेठ हलवाई गणपती अलका चौकात दाखल झाला आहे. थोड्याच वेळात या गणपतीचे विसर्जन केले जाईल..राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहेत. मुंबई शहरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांना निरोप दिला जात आहे. .पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणजेच केसरी वाडा गणपती हा अलका टॉकीज चौकात दाखल झाला आहे. .गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान श्राॅफ बिल्डिंग जवळ तीन गणपती एकत्र येणार आहेत. लालबागचा राजा आल्यानंतर थोड्याच वेळात चिंचपोकळीचा चिंतामणी देखील येथे येणार आहे. .पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणपती मुर्तीच्या मागील सजावटीला आग लागल्याचे पाहायला मिळाले. फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र कार्यकर्त्यांनी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. .पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन संपन्न झाले आहे. .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांच्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपती दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी फडणवीस यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावर्षी विसर्जनाच्या दिवशी भेट देण्याची संधी मिळाली, गणपती बाप्पा विग्नहर्ता आहे, सर्वांना सद्बुद्धी देवो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो अशी प्रार्थना करतो असेही फडणवीस म्हणाले. .लालबागचा राजाच फटाके वाजवून स्वागत करण्यात आले, आता लालबागचा राजा प्रवेशद्वारावरुन श्रॅाफ बिल्डींगकडे निघाला आहे. .पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीचे विसर्जन संपन्न झाले आहे. यासोबतच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला देखील सुरूवात झाली आहे. तर तांबडी जोगेश्वरी गणपती हा टिळक चौकात दाखल झाला आहे. .नाशिकमधील सातपूर परीसरातील 4 वाजेपर्यंत एकूण 10349 गणेश मुर्तींचे संकलन करण्यात आले आहे. 1- गंगापूर धबधबा - 8212-सोमेश्वर मंदीर - 6473-आनंदवली चादंशी - 3904-आसाराम बापू पुल- 6005- पाईपलाईन रोड - 6706' शिवाजी नगर - 8357- अशोक नगर पो.चौ.-8678- नासर्डी पुलं लिकरोड- 38429- आयटीआय पुलं - 1877.एकूण मुर्ती दान संकलन - 10249.पुणे शहरात मोठ्या जल्लेषात गणपती विसर्जन सुरू असून मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जन घाटावर दाखल झाला आङे, अगदी थोड्याच वेळात त्याचे विसर्जन केले जाईल. .मुंबईच्या जुहू चौपाटीवर दुपारी बारा वाजले पासून गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या ठिकाणी 105 गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. आतापर्यंत 35 घरगुती, तर 70 सार्वजनिक गणपती विसर्जन करण्यात आले आहे. पालिकेचे AMC अमित सैनी यांनी देखील या ठिकाणी पालिकेच्या सोयीसुविधांचा आढावा घेतला..पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुक मोठ्या उत्साहात सुरू असून परशुराम ढोल ताशा पथक टिळक चौकात दाखल झाले आहे. तीन वाजेपर्यंत ७१ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन पार पडले असून २६१४ घरगुती गणपती आणि १२ गोरींचे देखील वसर्जन झाले आहे. ."गौरीनन्दन गजानना | गिरिजानन्दन निरञ्जना पार्वतीनन्दन शुभानना | शुभानना शुभानना पाहि प्रभो मां पाहि प्रसन्नाम्॥ माझ्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब गौरीनंदन गणरायाची आरती केली. गेले दहा दिवस गणरायाच्या सहवासामध्ये कसे गेले ते कळलेच नाही. आज बाप्पांना निरोप देण्याचा क्षण आला आहे. यावेळी गणरायाकडे जनतेच्या सर्व चिंता-विघ्ने दूर करावे आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे हसत खेळत आनंद घेऊन लवकर यावे, अशी प्रार्थना केली." अशी पोस्ट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर केली आहे, सोबतच त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे..मुंबईतील बोरिवली येथून उपनगरचा राजा विसर्जनासाठी मार्गस्त झाला आहे. .गणेश गल्लीचा राजा श्राॅफ बिल्डिंग जवळ आला आहे. याठिकाणी गणरायावर पुष्पवृष्टी सुरु करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त उपस्थित आहेत..पुणाच्या विसर्जन मिरवणुकीचा महत्वाचा टप्पा म्हणजे अलका टॅाकीज चौक. लक्ष्मी रस्त्यासह केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता आणि टीळक रस्त्यावरुन येणार्या सर्व मिरणुका अलका चौकात येतात. इथुनच विसर्जनासाठी रवाना होतात. मानाच्या गणपतींच्या स्वागतासाठी अलका चौकात भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. राष्ट्रीय कला आकादमीने ही रांगोळी साकारली आहे..चिंचपोकळी चा चिंतामणी मिरवणूक सुरू झालीय आहे. चिंतामणीच्या अखेरच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त जमा झाले आहेत..नाशिकच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी परदेशी पाहुण्यांनी देखील ढोल वाजवण्याचा आनंद घेत मिरवणुकीत सहभाग घेतला.इंदापूर शहरातील मानाच्या पहिल्या तिन्ही गणपतींची विधिवत पूजा करून पारंपरिक वाद्यासह आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीसह रथातून विसर्जन मिरवणूकीला दुपारी उत्साहात सुरुवात करण्यात आली.. ड्युटीवर तैनात होण्याआधी मुंबई पोलिसांनी पोलिस ठाण्यातील बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मुलुंड पोलीस ठाण्यातील बाप्पाला पोलिसांनी बाप्पाला निरोप दिला. .मानाचे पाच ही गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग मंडळ, केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहे. .तेजुकायाच्या राजाचं थोड्याच वेळात श्रॉफ बिल्डिंग जवळ आगमन होणार आहे. यावेळी तेजूकायाच्या राजावर पुष्पव्रुष होणार आहे. .सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी लालबागमध्ये दाखल झाले आहेत. गर्दीचे नियोजन आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सहपोलीस आयुक्त लालबागमध्ये दाखल झाले आहेत .लालबागचा राजा कार्यकर्त्यांची दादागिरी करत असल्याचे समोर आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी महिला पोलिसांना शिवीगाळ केला .परळचा राजाची विसर्जनाची मिरवणूक निघाली असून थोड्याच वेळात श्राॅफ इमारतीतून रहिवाशी पुष्पवृष्टी करणार आहेत.लालबागच्या राजाची विर्सजन मिरवणूक मुख्य द्वारावर तुफान गर्दी .लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्ज झाले असून मनपाकडून 56 ठिकाणी कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता मिरवणूकीला सुरुवात होणार आहे. .कोल्हापुरात पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. कोल्हापुरातील मानाचा श्री तुकाराम माळी तरुण मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने या मिरवणुकीला सुरुवात होते. तुकाराम माळी तरुण मंडळाला दीडशे वर्षांची परंपरा आहे. .आज विसर्जन मिरवणूक सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने पुणे पोलीसांकडून मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांच्या संदर्भात एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग, पर्यायी मार्ग, पार्किंगची सोय असे अनेक मुद्द्यांची माहीती देण्यात आली आहे. .लालबागचा राजा मंडळाच्या मेन गेटवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी पोलिसांना पुढे यावे लागले व गर्दी बाजूला करावी लागली. .पुण्यात मानाचा पहिला गणपती म्हणून ओळख असलेला कसबा गणपती विसर्जनासाठी निघाला आहे. .थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या आरतीला सुरुवात होणार आहे. त्या नंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल .Kasba Ganpati Visarjan Live: पुण्यात मानाचा पहिला गणपती म्हणून ओळख असलेला कसबा गणपती ९ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीसाठी निघेल. त्याअगोदरतयारी सुरू करण्यात आली आहे. .मुंबईचा राजा अशी ओळख असलेला गणेश गल्लीला राजा विसर्जनासाठी निघाला आहे. .गणेश गल्लीच्या आरतीला लवकरच सुरूवात होणार आहे. .आज दुपारी ४ वाजता दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. रात्री ८ वाजता, गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. .श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मुर्ती बुधवार पेठ येथील कोतवाल चावडी मुख्य मंडपातून मंदिरामध्ये विराजमान.दहा दिवस लाडक्या गणरायाची पूजा केल्या नंतर आज लाडक्या लालबागच्या राजाला निरोप दिला जाणार आहे. 11 वाजता राजाची राजेशाही मिरवणूक लालबाग मार्केटमधून निघणार आहे. .दगडूशेठ गणपतीची मूर्ती मुख्य मंदिराच्या दिशेने निघाली आहे. यावेळी गणरायाची मूर्ती मुख्य मंदिरात ठेवली जाणार आहे. .दहा दिवस गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा दिवस आहे. . काही वेळेतच मुंबईच्या राज्याची आरती सुरू होईल आणि मग विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल..पुणे -शहरात गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी (ता. १७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे. या मिरवणूक कालावधीत नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दोन दिवस शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. तसेच, मुख्य मिरवणूक मार्गांवर अग्निशामक दल, पोलिस, रुग्णवाहिका आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील रथ वगळता अन्य वाहनांना बंदी राहील. बुधवारी (ता. १८) मिरवणूक संपेपर्यंत हा आदेश लागू राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली..दहा दिवस उल्हासाने पूजन केलेल्या बाप्पाचे आज थाटात विसर्जन केले जाणार आहे. यासाठी मुंबई-पुण्यासह राज्यभरात प्रशासनाकडून चोख नियोजन ठेवले आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडवा यासाठी मुंबई- पुण्यासह राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये वाहतूकीचे नियोजन देखील करण्यात आले आहे. दिवसभरातील गणपती विसर्जन मिरवणुकीचे सर्व लाइव्ह अपडेटस तुम्ही येथे वाचू शकता... .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.