पुणे - वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवास शनिवार (ता. ७) पासून प्रारंभ होत असून, १७ सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहे. या कालावधीत हा उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडण्यासाठी शहर पोलिस दल सज्ज असून, सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत दिली.