पुणे - मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणपतींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबलचक रांगा... हलते आणि जिवंत देखावे पाहण्यासाठी झालेली गर्दी... जागोजागी गणेशोत्सव मंडळांसमोर सुरू असलेल्या ढोल-ताशाच्या स्थिर वादनात भाविकांनी धरलेले ताल... अन् एकामागून एक मंडळ पाहत पुढे सरकणाऱ्या भाविकांच्या अलोट गर्दीच्या चैतन्याने उसळलेल्या अगणित लाटांनी बहरलेले भक्तिमय वातावरण... हेच गणेशोत्सवातील सातव्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.