वाघोली - आई, वडील, भाऊ, बहीण यांची लेखी डीजे साठी परवानगी आणा, मी पण डीजेला परवानगी देतो. गणपती हा सार्वजनिक उत्सव आहे. तो जल्लोषात साजरा झाला पाहिजे. मात्र सर्व नियम व कायदे पाळूनच अन्यथा गुन्हे दाखल करावे लागतील. असा इशारा परिमंडळ चारचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिला.