Ganeshotsav : पुणे मेट्रोला गणपती पावला; एका दिवसात तब्बल दोन लाख प्रवाशांची झाली वाहतूक

शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल एक लाख ७५ हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला.
Pune Metro
Pune Metrosakal
Updated on

पुणे - पुणे शहराच्या मध्य भागातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी कोथरूड, पिंपरी-चिंचवड, रामवाडी आदी भागांतूनही नागरिक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे मेट्रोतून उच्चांकी म्हणजेच सुमारे दोन लाख प्रवाशांची वाहतूक शनिवारी (ता. १४) झाली. दुपारपासून मेट्रोचे डबे प्रवाशांनी फुल्ल झाले होते, तर स्थानकेही गजबजून गेली होती.

वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गांवर मेट्रो सध्या सुरू आहे. शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल एक लाख ७५ हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोची सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.