Ganeshotsav : पुण्यनगरीत गणरायाचे उत्साहात स्वागत

पुण्यनगरीच्या वैभवशाली परंपरेला साजेशा अशा जल्लोषपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पुणेकरांनी मंगळवारी गणरायाचे स्वागत केले.
Dagdusheth Halwai Ganpati
Dagdusheth Halwai Ganpatisakal
Updated on

पुणे - पुण्यनगरीच्या वैभवशाली परंपरेला साजेशा अशा जल्लोषपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पुणेकरांनी मंगळवारी गणरायाचे स्वागत केले. शहर आणि जिल्ह्यात गणेश चतुर्थीनिमित्त अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. मानाच्या गणपतींसह प्रमुख गणेश मंडळे, सोसायट्या तसेच घराघरांत गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांना सकाळीच प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि आकर्षक रथांमध्ये काढलेल्या या मिरवणुका आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या. दुपारी तीन वाजेपर्यंत जवळपास सर्वच प्रमुख मंडळांच्या गणरायाची प्रतिष्ठापना झाली होती. घरगुती गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी १ वाजून ५० मिनिटांपर्यत मुहूर्त होता. त्यामुळे नागरिकांनी सकाळीच प्रतिष्ठापना करण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर सोसायट्यांमध्येही श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे व मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी सायंकाळी मध्य पुण्यात गर्दी केली होती. त्यामुळे शनिवारवाडा, मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला होता. अनेक मंडळांनी सायंकाळी काढलेल्या मिरवणुकांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ढोल-ताशा पथकांनी केलेल्या स्थिर वादनाला त्यांची दाद मिळाली.

शहरात दिवसभर वातावरणात उकाडा असला तरी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. ‘श्रीं’ची आगमन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनीही खबरदारी घेतली होती. कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पुण्यनगरी ‘गणराज’रंगी रंगली

गणरायाच्या आगमनासाठी शहर सजले होते. स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभ्या करून मिरवणूक मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीत गुलालाची तर गणरायावर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. त्यामुळे अवघी पुण्यनगरी ‘गणराज’रंगी रंगली, असे चित्र पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.