पुणे - गणेश प्रतिष्ठापनेनिमित्त गुरुवार (ता. ५) ते शनिवार (ता. ७) या कालावधीत गणेश मूर्ती खरेदीसाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. या परिसरात नागरिकांची गैरसोय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.