Pune Ganpati : गणेशोत्सवात पुण्याला धोका? वातावरण बिघडवण्याचा होऊ शकतो प्रयत्न; पुणे पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Pune Ganpati
Pune GanpatiSakal
Updated on

पुणे : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून मंडळांकडून या उत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे. पुण्यात राज्यभरातून गणेश भक्त गणपती आणि देखावे पाहण्यासाठी येत असतात. पण गणेशोत्सव काळामध्ये पुण्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे.

जुलै महिन्यामध्ये पुणे पोलिसांनी कोथरूड भागामध्ये दोन दहशतवादी पकडले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस सतर्क झाले आहेत. गणोशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे.

अधिक माहितीनुसार, काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील गणेश मंडळांच्या बैठका पार पडल्या. या बैठकीमध्ये पोलिस आयुक्तसुद्धा उपस्थित होते. त्यांनी सगळ्या मंडळांना आव्हान केलं की, "या गणेशोत्सवात काही समाजकंटकांकडून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून असे प्रयत्न केले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. कुणालाही काही संशय आला तरी तुम्ही पोलिसांना कळवा, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा बसवा." असं आवाहन गणपती मंडळांना करण्यात आलेले आहे.

Pune Ganpati
Supriya Sule : 'गृहखात्याचा वचक नाही'; साताऱ्यात महिलेला भररस्त्यात मारहाण प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

दरम्यान, गेल्या काही दिवसांत पुण्यातून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती, त्याचबरोबर कोंढवा भागात एटीएस, एनआयएची कारवाई सातत्याने सुरू आहे. त्यामुळे दहशतवाद्यांकडून पुण्याला टार्गेट केलं जाऊ शकतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. या काळात आम्हाला अधिकचे पोलिस बळ किंवा सीआरपीएफच्या तुकड्या लागू शकतात त्यामुळे त्या पुरवण्याची मागणी पोलिस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.