पुणे - ‘शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात बुधवारी (ता. १८) दुपारी पार पडली. मंडळांचे पदाधिकारी आणि पोलिस प्रशासनामध्ये चांगला समन्वय होता. गणेश भक्तांनी पोलिसांना चांगले सहकार्य केले. पोलिसांनीही बंदोबस्ताची जबाबदारी उत्कृष्ट पार पाडली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडला नाही,’’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.