मार्केट यार्ड - गौराईंचे मंगळवारी आगमन होणार असल्याने गौराईंसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे चित्र आहे. गौराईंच्या आकर्षक मुखवट्यांची महिलांना भुरळ पडत आहे. विविध दागिने, रेडिमेड साड्या खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. गौराईंचे मुखवटे कापडी, शाडू, फायबर आणि पीओपीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.