लेजर बीम विरोधात जनहित याचिका दाखल होणार

राजकीय नेतेमंडळींचा पुढाकार
लेजर बीम विरोधात जनहित याचिका दाखल होणार
Updated on

पुणे - गणेशोत्सव किंवा नवरात्र उत्सव आणि अगदी लग्न समारंभात देखील सर्रास वापरल्या जाणाऱ्या लेजर लाईटला विरोध करण्यासाठी पुण्यातील माजी महापौर अंकुश काकडे आणि त्यांच्यासोबत काही राजकीय मंडळींनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पातळी सोडून होणार डीजेचा आवाज आणि लेजर लाईट यामुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा सर्वच प्रकार थांबायला हवा यासाठी आता पुण्यातील राजकीय मंडळीच पुढे आली आहेत.

यंदाच्या गणेशोत्सवात अनेकांना या लेजर लाईटचा त्रास झाला. पुण्यातील १९ वर्षीय तरुण अनिकेत याने तर आपली सत्तर टक्के दृष्टी गमावली असल्याचे सांगितले. तर डीजेचा आवाज देखील शंभर डेसिबलच्या पुढे गेला होता.

या सर्वच प्रकाराबाबत समाज माध्यमांमधून देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. हा सर्वच प्रकार उत्सवाचे स्वरूप बिघडविणारा असल्याचे सांगत या विरोधात येत्या तीन चार दिवसांत मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याचे पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.

संस्कृतीचे पालन करताना सामाजिक भान हवेच, अशी भूमिका घेत माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी सभागृह नेते उज्ज्वल केसकर, सतीश देसाई ॲड. श्रीकांत शिरोळे ही मंडळी जनहित याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.

लेजर बीम विरोधात जनहित याचिका दाखल होणार
उत्सव आणि उन्मादातील फरक कधी ओळखणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.