Gang War In Pune : महिनाभरातील 'या' गुन्हेगारी घटनांनी वाढवलं पुणेकरांचे टेन्शन

पुण्यात जे काही चांगलं वाईट घडतं त्याची नोंद महाराष्ट्रासह देशभरात घेतली जाते.
gang
gang sakal
Updated on

Gang War In Pune : पुणे तिथे काय उणे अशी म्हण आपण ऐकत आलो आहोत. पुण्यात जे काही चांगलं वाईट घडतं त्याची नोंद महाराष्ट्रासह देशभरात घेतली जाते.

सिंहगड रस्ता, कात्रज आंबेगाव, हडपसर, वानवडी यासह विविध भागात अशा घटना सातत्याने घडत असून गुन्हेगारांकडून पोलिसांना आव्हान दिले जात आहे. असे असतानाही पोलिसांकडून गुन्हेगारांविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्याची सद्यस्थिती असून त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

gang
नाशिकमधील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी ठरतेय डोकेदुखी! तरुणाई भरकटल्याचे प्रमाण अधिक

शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. देशभरासह विदेशातूनदेखील लाखो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी दाखल होत असतात. मात्र, आता पुण्याचा चित्र शिक्षणाचं माहेर घर असण्याबरोबरच गुन्हेगारीचं वाढतं शहर म्हणून उदयास येऊ लागली आहे.

गेल्या महिनाभरात पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरात पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात घडलेल्या या मोठ्या गुन्हेगारी घटनांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

gang
Crime News : 2022 सालात गुन्हेगारी जगतातील घडामोडी ज्यामुळे समाज हादरला...

क्रूरतेचा कळस! 100 रूपयांसाठी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला

पुण्यातील पाषाण परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. 100 रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला आहे.

या घटनेप्रकरणी 2 जणांना अटक केली असून 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पंकज तांबोळी नावाची व्यक्ती जखमी असून आहे.

पाषण सारख्या वर्दळीच्या परिसरात अशाप्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

किरकोळ कारणावरून कसब्यात दोघांवर कोयत्याने वार

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगने पुन्हा दहशत निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. अतिशय वर्दळीचा परिसर असलेल्या कसबा पेठेत किरकोळ कारणावरून टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केले.

या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी आणि मुख्य पुण्यात ही घटना घडल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

gang
Pune Crime News: पुण्यात कोयता घेऊन तरूणांची खुलेआम दहशत; थरारक घटनेचा Video Viral

खडकवासल्या सराईत गुन्हेगारांचा हैदोस

काही दिवसांपूर्वी खडकवासला भाजी मंडई येथे कोयते फिरवत दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी पुन्हा हैदोस घालण्यास सुरूवात केली आहे. या टोळक्याने कोयता, लोखंडी रॉड व दगडांनी काही चारचाकी वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

खडकवासला परिसरात शनिवार रविवारी मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी येत असतात. त्यात अशा प्रकारे टोळके गाड्यांचे नुकसान करत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आंबेगावातही कोयता गँगची दहशत

शहरातील विविध भागात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. इतर परिसरांप्रमाणे आंबेगावातही २८ डिसेंबर २०२२ रोजी दोघांनी कोयत्याने वाहनांची तोडफोड केली. तसेच तिघेजण जखमी झाले.

गाड्यांची तोडफोड करण्याबरोबरच या टोळक्याने हातात कोयते फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलिसांनी एकाचा पाठलाग करत चांगलाच चोप दिला.

gang
Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत; फुकट भाजी दिली नाही म्हणून...

फुकट 'काजू कतली' साठी तरुणांकडून गोळीबाराचा प्रयत्न

कोयता गँगसोबतच बंदुकीचा धाक दाखवत फुकट गोष्टी मिळवण्याच्या घटनाही पुण्यात वाढता दिसत आहे.

२० डिसेंबर रोजी काजू कतली फुकट दिली नाही म्हणून एका तरूणाने चक्क सिंहगड रोडवरील एका स्वीट मॉलमध्ये गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे सिंहगड रोड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, गोळीबार प्रकरणी पोलिसांना एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.