पुणे - महापालिकेतील कामाचे कंत्राट मिळविण्याच्या वादातून कनिष्ठ अभियंता आणि ठेकेदारात झालेल्या वादातून खडक पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या वादाचे मूळ पनवेल येथील ऑर्केस्ट्रा बारमध्ये घडलेल्या घटनेत असल्याचे समोर आले आहे.
या घटनेबाबत महापालिकेतील अभियंता गणेश गिते (३७, रा. भवानी पेठ) यांनी नवीन पनवेल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून निर्मल हरीहर (रा. गंज पेठ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
गिते मित्रांसमवेत २० जुलैला रात्री पनवेल येथील ऑर्केस्ट्रा बारमध्ये गेले होते. त्यावेळी हरिहर त्यांच्या मित्रांसमवेत आले होते. त्याठिकाणी हरिहर यांनी धक्का दिल्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी मारहाण करून ९० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून घेतली, असे गिते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी गंज पेठेत त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. महापालिकेतील कंत्राट न घेण्यासाठी गीते यांनी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली, असे हरिहर यांनी फिर्यादीत म्हटले होते. तर ठेकेदार हरिहर यांनी मारहाण केली, अशी तक्रार गीते यांनी दिली होती. या प्रकरणी दोघांनी खडक पोलिस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार दिली होती. त्यांच्याविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.