पुणे - शहरातील रस्ते झाडणे, कचरा संकलन पहाटेच सुरु होते. पण महापालिकेचे ठेकेदार त्यांच्याकडचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सकाळी आठ नंतर सुरु करत आहेत. त्यामुळे प्रकल्पांबाहेर कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांची लांबच्या लांब रांगा लागत आहेत. त्याचा परिणाम शहरातील कचरा व्यवस्थापनावर होत असून, गाड्यांची वाट पाहत बसावे लागत आहे. त्यामुळे आता सकाळी सात वाजता कचरा प्रकल्प सुरु करण्याचे आदेश ठेकेदारांना देण्यात आले आहेत.