पुणे : हॉटेल व्यवसायायिक रामदास आखाडे यांचा खून केल्या प्रकरणात तलवार घरात लपवून आरोपींना मदत केल्याप्रकरणी लोणीकाळभोर (Lonikalbhor) पोलिसांनी (Police) एका आरोपीच्या पत्नीस अटक केली आहे. काजल चंद्रकांत कोकणे (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी )असे अटक महिलेचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तर एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. उरुळी कांचन (Urali kanchan) परिसरात १८ जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास आखाडे यांचा खून करण्यात आला होता. (Garwa hotel owner murder case accused wife arrested this reason)
नीलेश याने त्याचा ओळखीच्या अल्पवयीन मित्रास बोलावून घेत इतर साथीदारांच्या मदतीने आखाडे याचा तलवारीने वार करून खून केला आणि दोघे पसार झाले असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले. नीलेश याच्याकडे तपास केला असता त्याने आणि अल्पवयीन मुलाने गुन्ह्यांत वापरलेल्या दोन तलवारी लपविण्यासाठी पोत्यात गुंडाळून पत्नी काजल हिच्याकडे १८ जुलै रोजी दिल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बिबवेवाडी येथील घरी जाऊन काजलकडे तलवारीबाबत विचारणा केली असता तीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता कपाटाच्या मागे पोत्यात गुंडाळून ठेवलेल्या दोन तलवारी पोलिसांना मिळून आल्या.
नीलेशने तडीपार कालावधीत ५ तलवारी व कोयते बनवून घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यापैकी फक्त २ तलवारी हस्तगत केल्या असून इतर 3 तलवारीचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे णे, जप्त केलेल्या तलवारी आणखी दुस-या गुन्ह्यात वापरल्या आहेत का? याचा तपास करायचा आहे. त्यामुळे काजल हिला पाच दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील नितीन कोंगे यांनी केली. न्यायालयाने तिला २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.