Manchar News : 90 लाख रुपये खर्च करून तयार केलेली गँस शवदाहिनी एक वर्षापासून वापराविना धुळखात पडून

'वृक्षतोड रोखण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी मंचर (ता.आंबेगाव) येथे तपनेश्वर स्मशानभूमीमध्ये तब्बल ९० लाख रुपये खर्च करून एक वर्षापूर्वी तयार केली.
manchar gas crematorium
manchar gas crematoriumsakal
Updated on

मंचर - 'वृक्षतोड रोखण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी मंचर (ता.आंबेगाव) येथे तपनेश्वर स्मशानभूमीमध्ये तब्बल ९० लाख रुपये खर्च करून एक वर्षापूर्वी तयार केलेली गँस शवदाहिनी वापराविना धुळखात पडलेली आहे. सरपणाचे वाढते दर व तुटवडा निर्माण झाल्याने मृत व्यक्तीचे दहन कसे करावे. या विवंचनेत नागरिक आहेत.

मंचर नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मंचर, शेवाळवाडी, निघोटवाडी गावकऱ्यांच्या मागणीनुसार माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून ७५ लाख रुपये व माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणा दत्ता थोरात यांनी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. गॅस शवदाहिनीसाठी २०२१-२२ मध्ये निविदा मंजूर झाली. कामावर निधी खर्च झाला. गेल्या वर्षी काम पूर्ण झाले.

सदर शवदाहिनीची देखभाल कोणी करायची. याबाबत मंचर नगरपंचायत, निघोटवाडी, शेवाळवाडी ग्रामपंचायत यांच्यातील अंतर्गत वादामुळे सदर शवदाहिनी चालू झालेली नाही.' असे मंचर पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी सांगितले.

तेथील नव्याने बांधलेल्या स्वच्छतागृहाच्या दरवाजा व बेसिंगची तोडफोड, शवदाहिनीसाठी बसवलेले नोझल व नळ चोरीला गेलेले आहेत.तेथे दारूड्यांच्या बैठका होतात.तसेच मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे.

'माझी वसुंधरा माझा अभिमान नगरपंचायतीची घोषणा आहे.वाळलेले सरपणही वेळेत व पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. सध्या अंत्यविधीप्रसंगी पाच हजार रुपयांचा खर्च येतो. प्रशिक्षित कामगार नेमून गॅस शवदाहिनी लवकर सुरु करावी. मंचर नगरपंचायतीने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर मोफत अंत्यसंस्कार करावेत.'

- वसंतराव बाणखेले, अध्यक्ष मंचर नळ पाणीपुरवठा योजना.

'तपनेश्वर स्मशानभूमी गॅस शवदाहिनीची उभारणी निघोटवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने काम झाले आहे. सदर शवदाहिनी मंचर नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची मागणी मंचर नगरपंचायतीने सहा महिन्यापूर्वी याबाबत पुणे जिल्हा परिषदेकडे बैठक झाली आहे.परंतु अद्यापही हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण न झाल्याने नगरपंचायतीला कामकाज करताना मर्यादा येतात. हस्तांतरण झाल्यानंतर नगरपंचायतीच्या वतीने शवदाहिनीचा वापर सरू केला जाईल.'

- गोविंद जाधव, मुख्याधिकारी मंचर नगरपंचायत.

'पुणे जिल्हा परिषदेकडून मंचर नगरपंचायतीकडे शवदाहिनी तातडीने हस्तांतरित होण्यासाठी शेवाळवाडी व निघोटवाडी ग्रामपंचायत पाठपुरावा करणार आहे.'

- निलेश थोरात, सरपंच शेवाळवाडी (ता. आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.