शिवाजीनगर - घरातील सिलेंडर, शेगडी, रबरी पाईप इत्यादी गोष्टी सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी गॅस वितरण कर्मचारी ग्राहकांना ओटीपी मागत आहेत. मात्र ओटीपी मागणारा कर्मचारी आपल्या अधिकृत गॅस वितरकाकडून आला असल्याची खात्री करूनच ओटीपी द्यावा. अन्यथा ओटीपी दिल्यानंतर आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते. याची खबरदारी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.