Pune Gas Leak : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर गॅस गळती; प्रसंगावधानामुळे मोठा अनार्थ टळला

पोकलेनच्या माध्यामातून त्या ठिकाणी खोदकाम करण्यात येत होते, त्याचवेळी गॅस गळती झाल्याने पुन्हा माती टाकून गॅस वाहिणी बुजवण्यात आली
Pune Gas Leak
Pune Gas Leak
Updated on

शिवाजीनगर : जंगली महाराज रस्त्यावर हॅाटेल शिवम समोर चेंबर तुंबल्याने त्या ठिकाणी चेंबर दुरूस्त करण्यासाठी महापालिकेच्या ठेकेदाराकडून चेंबरचे खोदकाम सुरू होते. हे काम करत असताना अचानक गॅस गळती होऊ लागल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान आसपास असलेल्या व्यावसायिकांनी पळापळ करून विद्यूत व गॅसवर चालणारी सर्व उपकरणे बंद केली. नागरिकांनी आग्निशामक दलाला फोन केल्यानंतर एरंडवणे आग्निशामक दलाची गाडी लगेच त्या ठिकाणी आली. जवळच असलेल्या एका इमारतीच्या दूसऱ्या मजल्यापर्यंत गॅसचे फोवारे जात होते.

पोकलेनच्या माध्यामातून त्या ठिकाणी खोदकाम करण्यात येत होते, त्याचवेळी गॅस गळती झाल्याने पुन्हा माती टाकून गॅस वाहिणी बुजवण्यात आली तरी देखील गॅस गळती होत राहिली. काही वेळाने एमएनजीएल (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड) कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी आल्यावर गळती पाहण्यासाठी पोकलेनच्या माध्यमातून खोदकाम करताना आग लागली. तिथेच आग्नीशामक दलाची गाडी असल्याने लगेच आग आटोक्यात यश मिळाले . घटनेनंतर एमएनजीएल कंपनीकडून गॅसपुरवठा सुरळीत करण्याचे काम करण्यात येत होते.

ठेकेदार पवन जाधव "आमच्याकडून गॅस वाहिनी फुटली नाही" तर एमएनजीएलचे अधिकारी म्हणतात, “ठेकेदाराच्या कामामुळे गॅस गळती झाली." त्यामुळे नेमकं या घटनेला जबाबदार कोण? याचा शोध प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

Pune Gas Leak
Pune Airport : धावपट्टीचा होणार ‘ओएलएस’ सर्व्हे;पुणे विमानतळ,मंत्री मोहोळ घेणार राजनाथ सिंह यांची भेट

''चेंबरचे काम करण्यात येत होते त्यावेळी मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. आग्नीशामक दलाची गाडी वेळेत आली मात्र एमएनजीएल कंपनीचे कर्मचारी वेळेत आले नाहीत. जवळपास आर्धा तास गॅसगळती सुरू होती. परिसरातील नागरिक भयभित झाले होते. गॅस गळती झाल्यावर देखील पोकलेनच्या माध्यमातून खोदाई केल्याने आग लागली होती."

-विनोद थोरात, प्रत्यक्षदर्शी

"चेंबरचे काम करत असताना गॅस गळती सुरू झाली. काम करण्यापूर्वी एमएनजीएल कंपनीचा एक कर्मचारी जागेवर उपस्थित होता. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही खोदकाम करत होतो. मात्र त्यांनी चुकीची माहिती दिल्याने खोदकाम करताना गॅस गळती सुरू झाली."

- पवन जाधव, ठेकेदार

" गॅस गळती झाल्याचे समजताच आम्ही घटनास्थळी गेलो, चेंबरचे काम करत असताना गॅस गळती झाल्याचे समजले. नंतर गॅस पुरवठा बंद करण्यात आला. गॅस पुरवठा बंद केल्यावर पोकलेनच्या माध्यमातून पुन्हा खोदाई करताना आग लागली होती पाणी टाकूण आग आटोक्यात आणली."

- प्रवीण रणदिवे, आग्निशामक अधिकारी, एरंडवणे

"पोकलेनच्या माध्यमातून काम करत असताना त्यांच्याकडून गॅस वाहिनी फुटल्याने गॅस गळती सुरू झाली. आमचे कर्मचारी जागेवर गेले आणि लगेच गॅस वाहिनी दुरूस्त करण्याचे काम सुरू केले. गॅस गळती झाल्यास ९०११६७६७६७ क्रमांकावर नागरिकांनी तक्रार करावी.

-एमएनजीएल कंपनीचे अधिकारी

Pune Gas Leak
Laxman Hake: ओबीसींच्या हक्कांसाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या नेमक्या मागण्या काय? धनगर आरक्षणाचा प्रश्न मागे पडतोय का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com