मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गॅस टँकर उलटला, तिघांचा मृत्यू

सुदैवाना टॅकरमधून गॅस गळती झालेली नाही.
ExpressWay Accident
ExpressWay Accident Sakal
Updated on

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला असून, यामुळे मुंबई आणि पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. त्यावेळी खोपोली एक्झिटजवळ हा टँकर उलटला. दरम्यान, घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आदींनी घटनास्थळी धावा घेत मदतकार्य युद्धपातळीवर सुरु केले आहे. (Road Accident On Pune Mumbai ExpressWay Near Khopoli Exit)

ExpressWay Accident
सोमय्या सहकुटुंब पोलीस ठाण्यात दाखल, राऊतांविरोधात तक्रार

अपघातग्रस्त टँकर पुण्याहून मुंबईकडे निघाला होता. टँकर खोपोली एक्झिटजवळ असताना टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला आणि पुणे लेनवर आला. दरम्यान, अपघातानंतर टँकरला तीन गाड्या पाठोपाठ धडकल्या यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही मार्गांवरील वाहतूक मंदावली आहे. घटनेनंतर खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सुदैवाने अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती झालेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.