Pune News : कोथरूडकरांनो सावध व्हा! सिंहगडाजवळ पुन्हा दिसला गवा

gaur was seen near sinhagad fort pune Forest department officials on alert
gaur was seen near sinhagad fort pune Forest department officials on alert
Updated on

सिंहगड : काही वर्षांपूर्वी पुणे शहरातील कोथरूड परिसरात गवा शिरल्याचा प्रकार समोर आला होता, त्यानंतर परिसरात खळबळ माजली होताी. दरम्यान आता पुन्हा एकादा सिंहगडाला लागून असलेल्या मनेरवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीत गव्याचे दर्शन झाले आहे.

हा पूर्ण वाढ झालेला हा गवा मनुष्य वस्तीत येऊ नये म्हणून सकाळपासून प्राथमिक बचाव पथकाचे जवान गव्याभोवती खडा पहारा देत आहेत. वन विभागाच्या पथकासह रेस्क्यु टीमही थोड्याच वेळात मनेरवाडी येथे पोचत असल्याची माहिती भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी दिली आहे.

gaur was seen near sinhagad fort pune Forest department officials on alert
Ukraine-Maa Kali : युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट केला 'माँ कालीचा' आक्षेपार्ह फोटो; नेटकरी संतप्त

आज सकाळी मनेरवाडी गावच्या हद्दीत गवा आल्याची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली. त्यानंतर तातडीने प्राथमिक बचाव पथकाच्या जवानांनी गव्याला जंगलाकडे हुसकावून लावत तो पुन्हा मनुष्यवस्तीकडे येऊ नये म्हणून पहारा ठेवला आहे. गवा सध्या डोंगर कड्याशेजारी बसला असून तो भेदरून जाऊन काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याचे प्राथमिक बचाव पथकाचे तानाजी भोसले यांनी सांगितले.

gaur was seen near sinhagad fort pune Forest department officials on alert
Yuzvendra Chahal : रोहितच्या बर्थ डे पार्टीत युजवेंद्र चहल टल्ली? अडखळत चालतानाचा 'तो' Video Viral

"जंगलाचा परिसर असल्याने गव्याला पकडणे अवघड आहे. रेस्क्यु टीम दाखल होत असून गव्याला नैसर्गिक अधिवासाकडे हुसकावून लावण्यात येणार आहे. तसेच त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. शेतकरी,नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच विनाकारण गवा भेदरून काही विपरीत घटना घडेल असे कृत्य करु नये." - प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.