'...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!

Gautam_Pashankar
Gautam_Pashankar
Updated on

पुणे : कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत आणखी वाढ झाली. त्यात पैशासाठी तगादा वाढला. त्यामुळे आत्महत्येचा विचार आला. मात्र कुटुंबाचा विचार मनात आल्याने आणि आत्महत्येच्या विचारापासून मतपरिवर्तन झाल्याचे शहरातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर यांनी बुधवारी (ता.२५) स्पष्ट केले.

पाषाणकर यांचा तब्बल 32 दिवसानंतर छडा लागल्यानंतर त्यांना बुधवारी सकाळी विमानाने पुण्यात आणण्यात आले. त्यांची चौकशी केल्यानंतर पत्रकार परिषदेस त्यांनी हजेरी लावली. यावेळी पाषाणकर यांनी मागील 32 दिवसांचा प्रवास उलगडा केला. सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड आणि पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर यावेळी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांत व्यवसायातील उलाढाल थांबली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक कोंडी झाली. ती सुधरविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यातून बाहेर पडून न शकल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. स्वारगेट येथे रिक्षाने आल्यावर बसने थेट कोल्हापूर गाठले. कोल्हापूरवरून कोईम्बतूर, बंगळूर, तिरुपती-बालाजी, कन्याकुमारी, जैसलमेर असा प्रवास करत थेट जयपूरला पोचलो. बुधवारी जयपूर शहर सोडून निघणार होता. मात्र पोलिसांनी आदल्याच दिवशी मला गाठले. या कालावधीत कुटुंबाशी कोणताही संपर्क केला नाही, असे पाषाणकर यांनी यावेळी सांगितले.

बरोबर होते 80 हजार रुपये :
पाषाणकर पुण्यातून निघाले तेव्हा त्यांच्याकडे रोख 80 हजार रुपये होते. मोबाईल, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड त्यांनी नेले नव्हते. आहे त्या पैशांवर गुजराण करीत माझा प्रवास सुरू होता. पोलिसांना माझा शोध कसा घेतला हे काही समजले नाही, असे पाषाणकर म्हणाले.

गोळ्या घेणेही थांबवले :
पाषाणकर यांच्यावर काही उपचार सुरू आहेत. त्याच्या गोळ्या रोज त्यांना खाव्या लागतात. मात्र या काळात त्यांनी गोळ्या देखील घेतल्या नाहीत. गोळ्या खात नसल्याने आपल्याला नैसर्गिक मृत्यू येईल, असे त्यांना वाटत होते. मात्र सुदैवाने त्यांना काही झाले व आम्ही वेळेत त्यांच्यापर्यंत पोचलो, असे पोलिसांना सांगितले.

पाषाणकर यांना कोणहीती इजा होण्यापूर्वी त्याला पुन्हा कुटुंबाचा सहवास मिळवून देता याला व एक अघटित घटना टाळता आली याचे आम्हाला समाधान आहे. आयुष्यात चढउतार सुरूच असतात. त्यातून खचून जायला नको. पोलिसांनी केलेल्या शोधकार्यामुळे पाषाणकर परतले. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी कार्यरत असलेल्या पथकाचे कष्ट सार्थकी लागले. त्यांना धमकी देणारी राजकीय व्यक्ती कोण आहे, हे चौकशीतून समोर येईल.
-सुरेंद्र देशमुख, सहायक पोलिस आयुक्त

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.