पोलिसांची लायकी काढणे तरुणाला पडले महागात

तुला काय करायचे आहे ते कर. माझ्याकडे लायसन्स नाही, गाडीचे पेपर नाही. तू एक साधा कॉन्स्टेबल आहे, तुझी काय लायकी आहे ती मला माहित आहे.' असे म्हणत शिवीगाळ करून धक्कबुक्की केली.
Daund Police Station
Daund Police StationSakal
Updated on
Summary

तुला काय करायचे आहे ते कर. माझ्याकडे लायसन्स नाही, गाडीचे पेपर नाही. तू एक साधा कॉन्स्टेबल आहे, तुझी काय लायकी आहे ती मला माहित आहे.' असे म्हणत शिवीगाळ करून धक्कबुक्की केली.

दौंड - चारचाकी वाहनात मोबाईल संचावर बोलत असल्याने पोलिसांनी (Police) थांबविल्यानंतर पोलिसांची लायकी काढून शिवीगाळ करणार्या तरुणाची (Youth) कोठडीत (Custody) रवानगी करण्यात आली आहे. 

दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली, अवधुत ज्ञानदेव राऊत (वय ३१, रा. काष्टी ता. श्रीगोंदा) असे त्या तरूणाचे नाव आहे. ८ फेब्रुवारी रोजी दौंड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नाकाबंदी सुरू असताना हा प्रकार घडला.

Daund Police Station
पुण्यात का झाली होती बत्ती गुल? पुणेकरांनो, वाचा काय होतं कारण

वाहन चालविताना मोबाइल संचाचा वापर व तोंडावर मास्क नसल्याने विचारणा करताच अक्षय याने वाहतूक पोलिस अक्षय घोडके यांना' तुला काय करायचे आहे ते कर. माझ्याकडे लायसन्स नाही, गाडीचे पेपर नाही. तू एक साधा कॉन्स्टेबल आहे, तुझी काय लायकी आहे ती मला माहित आहे.' असे म्हणत शिवीगाळ करून धक्कबुक्की केली. नाकाबंदी दरम्यान १ सहायक निरीक्षक, ३ फौजदार व अंमलदार उपस्थित होते.

दौंड पोलिस ठाण्यात अक्षय राऊत याच्याविरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ९ फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.