दोन दिवसीय ऑनलाइन नृत्य, नाट्य, कला मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी दोन दिवसीय ऑनलाइन नृत्य, नाट्य, कला मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
दोन दिवसीय ऑनलाइन नृत्य, नाट्य, कला मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
sakal
Updated on

घोडेगाव : पंचायत समिती शिक्षण विभाग गट साधन केंद्र आंबेगाव व सेव द चिल्ड्रन यांच्या वतीने सोमवार दिनांक 13 सप्टेंबर व मंगळवार दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी दोन दिवसीय ऑनलाइन नृत्य, नाट्य, कला मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आंबेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. नृत्य, नाट्य, कलाच्या माध्यमातून शिक्षण पद्धती अधिक रंजक व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

दोन दिवसीय ऑनलाइन नृत्य, नाट्य, कला मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
मनोहर भोसले याची पोलिस कोठडी तीन दिवसांनी वाढली

सोमवार दिनांक 13 सप्टेंबर रोजीच्या पहिल्या सत्रामध्ये अभिनेता संदीप पाठक यांनी नाट्य, कला व शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, मातीशी नातं घट्ट असावे, तसेच कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर प्रामाणिकपणे मेहनत करणे गरजेचं आहे. पैसा आणि प्रसिद्धी यापेक्षा कामाच्या पाठीमागे धावा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून दिला. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. पहिल्या सत्राची सांगता अभिनेता संदीप पाठक यांनी 'वऱ्हाड निघालयं लंडनला' या एकपात्री नाटकाचे सादरीकरण करून केली.

मंगळवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी च्या दुसऱ्या सत्रामध्ये अभिनेत्री व कथ्थक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी नृत्यकलेतून शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. रोजच्या शिकवण्यामध्ये नृत्याचा उपयोग केला तर शिक्षण अधिक रंजक होईल,तसेच विद्यार्थ्यांच्या वयानुसार नृत्य अभिनय सादर करण्याच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असे त्या म्हणाल्या. नृत्यामध्ये शरीर हालचाल, चेहऱ्यावरील हावभाव याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे ही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. तसेच आपल्या शालेय जीवनातील काही अनुभव त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडले.

भारतीय सांस्कृतिक परंपरा असलेल्या कथ्थक नृत्य प्रकारांमध्ये दर्दी रसिक तयार करण्याचा त्यांचा संकल्प असून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने कथ्थक नृत्य प्रकार पोहचण्यासाठी नवीन योजना आखणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेची सांगता अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांच्या श्रीगणेशवंदना या नृत्याने झाली.

सदर कार्यशाळेला आंबेगाव पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, प्रशिक्षण संस्था पुणेच्या प्राचार्या डॉक्टर शोभा खंदारे, गट विकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेमध्ये विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विषयसाधन व्यक्ती, विशेष साधनव्यक्ती, विशेष शिक्षक, गटसाधन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी सहभाग घेतला होता.

कार्यशाळेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख साहेबराव शिंदे, तुषार शिंदे यांनी केले. आभार शिक्षणविस्तार अधिकारी संचिता अभंग व पद्माजा लोहट यांनी मानले. कार्यशाळेला तंत्रसहयाय हजारे यांनी केले तर कार्यशाळाचे सूत्रसंचालन परमेश्वर काकडे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()