घोडेगावामध्ये पंचायत समितीच्या इमारतीच्या उदघाटन

घोडेगावामध्ये पंचायत समितीच्या  इमारतीच्या उदघाटन
घोडेगावामध्ये पंचायत समितीच्या इमारतीच्या उदघाटनsakal
Updated on

घोडेगाव : आदिवासी भागातील शेतीचे नुकसान दुरुस्त करण्यासाठी पडकई कार्यक्रमासाठी आदिवासी विभागाला 10 कोटी रुपये देण्यात येईल. तसेच घोडेगाव येथे अद्यावत सभागृहासाठी 10 कोटी रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील पंचायत समितीच्या 4 कोटी रुपये खर्च करुन झालेल्या नविन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विष्णू हिंगे, भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, देविदास दरेकर , गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, माजी सभापती कैलास बुवा काळे , सरपंच क्रांती गाढवे, मंजुषा बोराडे उपस्थित होते.

घोडेगावामध्ये पंचायत समितीच्या  इमारतीच्या उदघाटन
सिद्धूंचा काँग्रेसवर लेटरबॉम्ब! सोनिया गांधींना चार पानी पत्र

अजित पवार म्हणाले, आरोग्य, पोलीस, ग्रामविकास विभागातील भरती प्रक्रीया सुरु आहे. कायदेशिर अडचणी येऊ नये म्हणून सतत त्यावर काम सुरु आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा आहे. या भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अदित्य ठाकरेंबरोबर चर्चा करुन मार्ग काढू. जनतेची कामे व्हावीत यासाठी आमदार निधी 3 कोटी वरुन 4 कोटी करण्यात आला आहे. म्हाळसाकांत उपसा योजना, सातगाव पठार जलसिंचन योजना व आदिवासी भागातील जलसिंचन या योजनांसाठी सर्वे करण्यासाठी निधी दिला आहे. त्यानंतर ही कामे वळसे पाटील यांच्या सुचनेप्रमाणे केली जातील.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव, शिरुर, जुन्नर तालुक्याला पर्यटनासाठी निधी द्यावा. घोडेगाव येथे सभागृहासाठी 10 कोटी रुपयाचा निधी देण्याची मागणी केली. तसेच डिंभे येथील पर्यटन स्थळासाठी निधी द्यावा, तसेच भिमाशंकर येथील विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन या कामासाठी निधी देण्याची मागणी केली. कोरोना व नैसर्गिक संकटे यावर जनतेला दिलासा देण्यासाठी अजित पवार यांनी अर्थखात्याची तारेवरची कसरत करुन न्याय देण्याचे काम केले. सोमेश्वर कारखाना निवडणुकीत विरोधी पॅनल धूळ चारल्या बद्दल कारखान्यातील सभासद व अजित पवार यांचे जाहीर अभिनंदन केले.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव मधील उल्लेखनिय व दर्जेदार कामे झाल्याचे सांगितले. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघात अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष दिल्यामुळे विकासाला गती मिळाली असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()