घोडेगाव : सुगरण स्पर्धा, महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

महिलांनी केलेल्या आवाहनाला कोढवळ(ढगेवाडी) तेंरुगण येथील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
sugran competition
sugran competitionsakal
Updated on

घोडेगाव : तेंरुगण(ता आंबेगाव)येथे सुगरण स्पर्धेत सहभाग घेणेसाठी यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयं:सिद्ध संघ आंबेगाव यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या ताथवडीदेवी महिला स्वयं:सहाय्य विभागातील संघ पदधिकारी यशोदा बाळू कोढवळे व संघ कार्यकर्ते शिवाजी शेटे व नारीशक्ती गुरुकृपा गुरुदेवदत्त शिवशंकर विघ्नहर्ता मुक्तारेश्वर सह्याद्री या बचत गटांतील महिलांनी केलेल्या आवाहनाला कोढवळ(ढगेवाडी) तेंरुगण येथील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना यशोदा कोढवळे म्हणाल्या, सुगरण स्पर्धेत सहभाग घेऊन दररोज नवीन पदार्थ बनविण्याची माहिती मिळणार आहे. यामधूनच आकर्षक बक्षिसे जिकण्याची संधी सकाळच्या माध्यमातून चालून आली आहे. आपली पाककलेला कलात्मकता व सुबकता यामधून येणार आहे.

sugran competition
कोल्हापूर : 'ऑक्सिजन देणारी मशीद'

असे मनोगत त्यांनी यावेळी प्रवेशिका वाटताना व्यक्त केले. यावेळी ग्रुप ग्राम पंचायत सदस्या व विभागाच्या अध्यक्षा मिराबाई कोकाटे म्हणाल्या, आपल्याला सकाळच्या सुगरण सदरातून पाककला व ज्ञानाची मेजवानी मिळणार आहे.यावेळी मोठ्या उत्सकुतेने बचत गटांतील महिला वनिता विरणक ,शोभा तिटकारे ,सावित्रीबाई चिमटे ,राधाबाई चिमटे, आशा लोहकरे ,कलाबाई असवले, अनिता विरणक, सुमन चिमटे ,मंगल लोहकरे ,आशा तिटकारे काळूबाई विरणक, सखुबाई कोकाटे, सखुबाई कारोटे, मंगल तिटकारे अनिता केदारी, सुनिता केदारी, सिता विरणक, दुलाबाई गेंगजे, गिरजा बाणेरे, तारामती कोकाटे, भामाबाई तिटकारे, ज्योती चिमटे ,पाराबाई असवले ,कल्पना केदारी, फसाबाई कोकाटे, विठाबाई कोकाटे, मिना वायळ, अलका चिमटे ,विमल बाणेरे, पाराबाई तिटकारे, कमाबाई चिमटे उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.