बारामती - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीच्या निमित्ताने राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (ता. 24) भिगवण चौकातून दुपारी तीन वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक भिगवण, अहिल्यादेवी चौक, गुणवडी चौकातून व्यापारपेठेतून स्टेशन रोड वरून शारदा प्रांगणात येणार आहे.
शारदा प्रांगणावर संध्याकाळी सहा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राम शिंदे, आमदार राहुल कुल, आमदार दत्तात्रय भरणे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे उपस्थित राहणार आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार या प्रसंगी होणार आहे.
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याबद्दल वैदयकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचा अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सवाचे आयोजक अभिजीत देवकाते यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.