पुण्यात संचारबंदी लागू असताना 'ती 'सकाळ' कार्यालयात पोहचली अन्...

A girl reached home safely with help of sakal staff and the police
A girl reached home safely with help of sakal staff and the police
Updated on

पुणे : शहरात संचारबंदी लागु असतानाही एक तरुणी गुरुवारी अचानक सकाळ कार्यालयात आली, रडवेल्या आवाजात "मला मदत पाहिजे, मला मदत करा" अशा शब्दात तिने सकाळच्या कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली. ती असंबद्ध बोलु लागल्याने कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनीही तिची विचारपुस करीत तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात चार दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव नागरीकांना घराबाहेर पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला आहे.असे असताना एक 20 ते 25 वयोगटातील एक तरुणी गुरुवारी सकाळी 9.30 वाजता 'सकाळ'च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आली. तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षक राहुल वाघ यांच्याकडे मदत मागितली. रडवेला आवाज, अशक्तपणा आलेल्या अवस्था झालेल्या या तरुणीकडे वाघ यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजीपोटी तरुणीची विचारणा केली. मात्र ती असंबद्ध बोलू लागल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी 100 क्रमांकावरुन पोलिसांना माहिती दिली. या घटनेनंतर 5 मिनिटात दाखल झालेल्या पोलिसांनी तरुणीला विश्रामबाग पोलिस ठाण्यात नेले. तिथे महिला पोलिस उपनिरीक्षक गीता पाटील यांनी तरुणीची आस्थवाईलपणे विचारणा केली. त्यावेळी तिने तिचे सामान वानवडी पोलिसांनी जप्त केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वानवडी पोलिसांमार्फत तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी तिला घरी नेले.

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास

संबंधित तरुणी एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला होती. मात्र तिचे तिच्या भावाशी कौटुंबीक कारणावरुन भांडणे झाली होती. त्यानंतर तिने तिच्या कुटुंबाला काहीही न सांगता घर सोडले होते. "तरुणीच्या मनावर परीणाम झालेला आहे. त्याच अवस्थते ती घराबाहेर पडली होती. ती सकाळ कार्यालयात आल्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही तिला पोलिस ठाण्यात आणुन तिची विचारपुस केली. त्यानंतर तिला कुटुंबाकडे पाठविले आहे" असे पोलिस उपनिरीक्ष पाटील यांनी सांगितले.

त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.