पुणे : तरुणीची सतर्कता अन् आगीतून वाचले चिमुकले भाऊ-बहीण

A Girl showed vigilance and saved the lives of siblings from the fire in pune.jpg
A Girl showed vigilance and saved the lives of siblings from the fire in pune.jpg
Updated on

मंचर : मंचर (ता. आंबेगाव) येथील मुळेवाडी रस्त्यावर असलेल्या मैत्री पार्क इमारतीतील सदनीकेला शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. यावेळी सदनिकेत झोपलेल्या दोन लहान मुलांना प्रसंगावधान राखून बाहेर काढण्यात आले. आगीमध्ये फ्रिज, वॉशिंग मशिन, फर्निचर, ग्रंथ, धार्मिक पुस्तके व संसारी उपयोगी साहित्य असे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

महेश काका पुणेकर यांच्या मालकीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेत ही आग लागली. संगणकाला जोडलेल्या वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुपारी घरामध्ये वेदांत (वय साडेतीन) व अवधूत (वय साडेपाच) हे दोघेजण झोपले होते. त्यांचे आई-वडील घरात नव्हते. घरातून धूर आल्याचे पाहून शेजारीच राहत असलेली करिष्मा ज्ञानेश्वर ढगे (वय 16) ही तरुणी पळत तेथे गेली. प्रसंगावधान राखून तिने अवधूत व वेदांत यांना घराबाहेर काढले. दहा ते पंधरा मिनिटातच आगीने रौद्र स्वरूप धारण केले.

गोकूळ बाणखेले, दत्ता दिघे, बाबाजी दाभाडे, रामा थोरात, गणेश महाराज भोर, राहुल थोरात, सूरज धरम, अक्षय चिखले या तरुणांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे व सहकारी मदत कार्यात सहभागी झाले होते.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.