Pune Crime : पुण्यात भाजी कापण्याच्या चाकूनं प्रेयसीनं केली प्रियकराची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

पुण्यातील वाघोलीमध्ये प्रेम प्रकरणावरून झालेल्या हत्येचं कारण समोर आलं आहे.
Pune Crime
Pune Crimeesakal
Updated on
Summary

अनुजानं भाजी कापण्याच्या चाकूनं यशवंतवर वार करुन त्याची हत्या केली. पोलिसांनी या हत्या करणाऱ्या प्रेयसीला अटक केली आहे.

Pune Crime : पुण्यातील वाघोलीमध्ये प्रेम प्रकरणावरून झालेल्या हत्येचं कारण समोर आलं आहे. गेल्या एक वर्षांपासून यशवंत आणि अनुजा यांची ओळख होती. मात्र, यशवंत तिला अनेकवेळा त्रास देत होता, तसंच तिच्यावर संशय घेत होता.

यावरुन दोघांची भांडणं झाली. अखेर अनुजानं भाजी कापण्याच्या चाकूनं यशवंतवर वार करुन त्याची हत्या केली. पोलिसांनी या हत्या करणाऱ्या प्रेयसीला अटक केली आहे. यशवंत महेश मुंडे (वय 22) असे खून झालेल्या प्रियकराचं नाव आहे, तर अनुजा महेश पनाळे (वय 21) असं प्रेयसीचं नाव आहे.

Pune Crime
Nanded : संतोष बांगरांचं आगमन होताच लग्नातही घुमल्या 'पन्नास खोके एकदम ओके'च्या घोषणा, ठाकरे गट पुन्हा आक्रमक

हे दोघंही वाघोलीतील रायसोनी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होते. अनुजा आणि यशवंत एक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते. या संदर्भात त्यांच्या घरच्यांना देखील माहिती असल्याची माहिती समोर आली आहे. हत्या करण्याच्या आदल्या रात्री म्हणजेच, रविवारी यशवंत राहत असलेल्या वसतिगृहात अभ्यासासाठी अनुजा गेली होती. त्यांचे सोमवारी पुन्हा जोरात भांडण झालं. त्या भांडणात अनुजानं यशवंतच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केले.

Pune Crime
VIDEO : 'मोटरमन'साठी सजवली लोकल, बॅनरही लागला अन् फलाटावर सुरु झाला टाळ्यांचा कडकडाट, नेमकं काय घडलं?

हत्या केल्यानंतर तिनं स्वतः हाताची नस कापून घेतली. घाबरलेल्या अवस्थेत बाहेर बाकावर येऊन बसली. हा सगळा प्रकार वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाहिला. त्यावेळी तिचं प्रचंड प्रमाणात रक्त गेलं होतं. तिची अवस्था पाहून वसतिगृहातील मुलांनी तिला दवाखान्यात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.