पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी या प्रशिक्षण संस्थेत प्रथमच मुली दाखल होणार

भविष्यात पुरुषां प्रमाणे महिला अधिकारी विविध तुकडीचे नेतृत्व करतील
 National Defense Academy pune
National Defense Academy punesakal
Updated on

पुणे : खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या प्रशिक्षण संस्थेत प्रथमच मुली दाखल होणार आहेत. त्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा तयार करण्यात येत असून मुलींच्या पहिल्या तुकडीसाठी एनडीए सज्ज आहे. एनडीएमध्ये मुलींसाठी सध्या एक स्क्वॉड्रन उपलब्ध करण्यात येणार आहे. या स्क्वॉड्रनचे प्रशिक्षणासाठी आवश्यक आणि विशिष्ट सुविधांनुसार नूतनीकरण करण्यात येत असल्याची माहिती एनडीए तर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने एनडीएमध्ये मुलींना प्रवेश देण्याबाबतचा निर्देश दिली होता. त्यामुळे प्रशिक्षण संस्थेत मुलींसाठी योग्य त्या पायाभूत सुविधा, प्रशिक्षण प्रणाली, महिला प्रशिक्षक अशा अनेक सुविधांच्या उपलब्धतेसाठी एनडीए मार्फत तयारी करण्यात येत असून सध्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. मुलींच्या विशिष्‍ट जीवनशैलीच्‍या आवश्‍यकता पूर्ण करण्‍यासाठी आवश्‍यक बदल देखील केले जातील. त्याचबरोबर दीर्घ कालावधीसाठी, केवळ मुलींसाठी स्वतंत्र स्क्वाड्रनची कल्पना केली जात असल्याचे ही एनडीएद्वारे सांगण्यात आले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने वर्षातून दोन वेळा एनडीएची लेखी परीक्षा घेण्यात येते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या लेखी परिक्षेत देशातील सुमारे एक हजार मुली उत्तीर्ण झाल्या असून सध्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतींची (एसएसबी) प्रक्रिया सुरू आहे. एसएसबीची प्रक्रियेनंतर वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर एनडीएच्या १४५ व्या तुकडीत १९ मुलींना प्रवेश मिळे. त्यातील सैन्यदलात १०, हवाईदलात ६ आणि नौदलात ३ इतक्या जागांचा सामावेश आहे. तर येत्या जून महिन्यापासून त्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

भविष्यात पुरुषां प्रमाणे महिला अधिकारी विविध तुकडीचे नेतृत्व करतील अशा प्रकारच्या संयुक्त प्रशिक्षण उपक्रमांचे देखील आयोजन केले जाईल. ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए), नेव्हल ॲकॅडमी आणि हवाईदल ॲकॅडमी येथे अशा पद्धतीचे संयुक्त प्रशिक्षण आधीपासूनच अस्तित्वात आहे. सध्याच्या अभ्यासक्रमात किमान बदल करून शैक्षणिक, ड्रिल आदींचे प्रशिक्षण पुरुष व महिला कॅडेट्सला समान पद्धतीने दिले जाईल. तसेच कॅडेट्सला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी दिली जाईल. प्रशिक्षण संस्थेत महिला कॅडेट्सच्या प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात येणार असल्याचे एनडीएने नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()