पुणे - ज्ञानाची कवाडे स्त्रियांना उघडे करण्यासाठी ज्या पुण्यात फुले दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा उघडली, त्याच पुण्यात लेकींच्या जन्मदराबाबत अनास्था दिसून येते. गेल्या वर्षी पुणे शहर व जिल्ह्यात मुलींचा जन्मदर घटला. एक हजार मुलांमागे केवळ ८९८ मुली जन्माला आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीतून ही बाब उघडकीस आली आहे.