Pune: मरणासन्न अवस्थेतील दीर्घिकांचा शोध

अद्ययावत जीएमआरटीमुळे शोधांची मालिका सुरू; पुण्यातील एनसीआरएचा सहभाग
 Radio Telescope GMRT
Radio Telescope GMRT sakal
Updated on

पुणे - खोडद स्थित जायंट मीटरव्हेव रेडीओ टेलिस्कोप (जीएमआरटी) अद्ययावत करण्यात आली असून, त्यामुळे विश्वातील अद्भुत शोधांची एक मालिकाच सुरू झाली आहे.

नुकतेच अवकाशातील मरणासन्न अवस्थेतील दीर्घिकांचा शोध जीएमआरटीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे खेचले गेले असून, विश्वातील नवनवीन रहस्यांचा पडदा उठत आहे.

अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल), पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राने (एनसीआरए) आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या खगोलशास्त्रज्ञांच्या

चमूने सुदूर अवकाश सर्वेक्षणांच्या आधारे काही विशिष्ट रेडिओ दीर्घिका शोधल्या आहेत. खगोल विज्ञानात अशा रेडिओ दीर्घिका किंवा त्यांचे अवशेष शोधण्याचे खास महत्त्व आहे.

या दीर्घिका स्वतःच्या जीवनचक्रातील अंतिम टप्प्याचे प्रतिनिधित्व करतात. यामुळे या आकाशगंगा मृत किंवा मायावी म्हणता येतील अशा आहेत. संबंधीत संशोधन ‘ॲस्ट्रोफिजिकल जर्नल’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशनासाठी स्वीकारण्यात आलेले आहे.

 Radio Telescope GMRT
Mumbai News : एसटीच्या ताफ्यात लवकरच टाटाच्या २५० नवीन बसेस

पीआरएलचे सुशांत दत्ता यांच्या प्रमूख सहभाग असलेल्या या शोधात पीआरएलचे वीरेश सिंग, सी.एच. एनसीआरएचे शास्त्रज्ञ डॉय. ईश्वरा चंद्र, डॉ. योगेश वाडदेकर, पीआरएलमधून अभिजित कायल आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून इयान हेवूड यांचा समावेश आहे.

रेडिओ दीर्घिका

ज्या केवळ रेडिओ निरीक्षणाद्वारे ओळखल्या जाऊ शकतात, मोठ्या प्रमाणात रेडिओ प्रारण उत्सर्जित करतात. हे प्रारण दीर्घिकेच्या मध्यभागी दोन ध्रुवांमधून उत्सर्जित होणारे असते. उच्च

तापमानाचे आयनीकृत प्रारण लाखो प्रकाश-वर्षांचा अंतराळात प्रवास करतात आणि विश्वातील सर्वात मोठी संरचना तयार करतात.

आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या सुपरमासिव्ह कृष्णविवरावर सामग्रीच्या वाढीमुळे जेट्स चालवले जातात आणि सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्लियस (एजीएन) ची उपस्थिती दर्शवतात. एकदा गॅलेक्टिक न्यूक्लियसची सक्रियता थांबली की, प्रारण उत्सर्जित होत नाही.

परंतु सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्लियसच्या रेडिओ प्रारण प्रारणांच्या अवशेषामुळे अदृश्य रेडिओ आकाशगंगा शोधल्या जाऊ शकतात.

 Radio Telescope GMRT
Mumbai Local: मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री ब्लॉक! 'या' लोकल रद्द; जाणून घ्या सविस्तर

विविध दूर्बिणींचा वापर

जीएमआरटीसह नेदरलँड्समधील लो-फ्रिक्वेंसी एरे (लोफार) दुर्बिणी आणि यूएसए मधील व्हेरी लार्ज अरे (व्हीएलए) तसेच ‘डीप मल्टी- फ्रिक्वेंसी’ रेडिओ सर्वेक्षणाचा वापर केला.

संशोधनाचे फायदे

  • अंतिम टप्प्यात रेडिओ दीर्घिकांच्या उत्क्रांतीवर नियंत्रित करणारे घटक समजतील

  • मृत स्त्रोतांच्या यजमान आकाशगंगा आणि इंटरगॅलेक्टिक माध्यमात किती ऊर्जा पुरवतात याचे मूल्यांकन करण्यास मदत करेल.

  • स्क्वेअर किलोमीटर ॲरेच्या भविष्यातील चाचणीसाठी उपयोगी

रेडिओ दीर्घिकांची आकडेवारी

  • - पृथ्वीपासूनचे अंतर : ४.२६ अब्ज प्रकाशवर्षे

  • - दोन्ही अवशेषांतील अंतर ः १५.३ लक्ष प्रकाशवर्ष आहे.

  • - जीएमआरटीच्या रेडिओ लहरी ः ३२५ मेगाहर्ट्झ रेडि

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.