पुणे- पुण्यात आता गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरु झाली आहे. सोहळ्यासाठी १७ सप्टेंबर रोजी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. पुणेच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी येत असतात. गर्दी वाढणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाय, विसर्जन मिरवणूक पाहायला येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुण्यात १३ ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन सोहळ्यानिमित्त १३ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था पोलिसांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे.