Pune News : गोखलेनगर'चे शहीद तुकाराम ओंबळे मैदान बनले मद्यपींचा अड्डा; महिलांमध्ये असुरक्षेची भावना

मध्यरात्री तीन, चार वाजेपर्यंत मद्यपान करत मोठ्या आवाजात शिवीगाळ करून दहशत पसरवण्याचे काम काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून गोखलेनगर येथे होत आहे.
Alcohol
Alcoholsakal
Updated on

शिवाजीनगर - मध्यरात्री तीन, चार वाजेपर्यंत मद्यपान करत मोठ्या आवाजात शिवीगाळ करून दहशत पसरवण्याचे काम काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून गोखलेनगर येथे होत आहे. यामुळे महिलांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या या कृत्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबळे मैदानावर तसेच वीर बाजीप्रभू शाळा या रस्त्यावर मद्यापींनी उच्छाद मांडला असून मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी मद्यापींचा गोंधळ सुरू असतो. हाकेच्या अंतरावर जनवाडी पोलिस चौकी असतांना पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

गोखलेनगरच्या मुख्य रस्त्यावर अनेक अनाधिकृत हातगाडीवाले आहेत, मद्यपान करण्यासाठी या हातगाडी चालकांकडून पाणी,ग्लास, इतर खाद्य मद्यापींना पोहच केले जाते. मद्यापान करणारे टोळक्यांनी बसून जोरजोरात ओरडतात, एकमेकांना शिवीगाळ करतात. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याला मद्यापींच्या टोळक्यांनी विनाकारण मारहाण व शिवीगाळ केली होती. यामुळे विद्यार्थी देखील असुरक्षित झाले आहेत.

Alcohol
Dr. Rajendra Singh : पीकपद्धतीत बदल न केल्यास जमीनींचे वाळवंट होणार

याबाबत स्थानिक रहिवाशी नितीन येवलेकर म्हणाले, 'सद्गुरू रिक्षा थांबा ते वीर बाजीप्रभू शाळा या रस्त्यावर बसून काही मद्यापी मद्यपान करतात. या परिसरात शिवीगाळ, हाणामारी करणे असे प्रकार सऱ्हासपणे सुरू आहेत. हे बसणारे गुंड प्रवृत्तीचे लोक स्थानिक नाहीत, इतर ठिकाणांहून ते या ठिकाणी येतात. पोलिस फक्त दाखवण्यापुरतं फेरफटका मारतात. पोलिस करावाई करत नाहीत त्यामुळे अशा लोकांचे फोफावते.'

'परिसरात मद्यपान, गांजा, सिगारेट असं व्यसन करणारी अनेक लोकं बसतात. यामुळे महिलांना असुरक्षित वाटत आहे. पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी योग्य उपायोजना करायला हव्या.'

- अॕड. राजश्री अडसूळ स्थानिक रहिवाशी गोखलेनगर

Alcohol
Ajit pawar : अजित पवारांच्या कानपिचक्यांनंतर एक्साईज व पोलिस विभाग हलला

नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर एका रहिवाशांनी सांगितले की, 'मद्यपान करणाऱ्या लोकांचा त्रास येथील नागरिकांना होत आहे. बहिणीबाळा असुरक्षित झाल्या आहेत. जनवाडी पोलिस चौकीला नेहमी टाळा लावलेला दिसतो. मैदानाच्या चारही बाजूंनी मद्यपान करत टोळक्याने बसलेली असतात. कोणताही नगरसेवक यामध्ये हस्तक्षेप करत नाही.यावरती करावाई होणं गरजेचं आहे.'

'यासंदर्भात माझ्याकडे देखील काही तक्रारी आल्या आहेत. संबंधित ठिकाणी चौकशी करण्यासाठी पोलीस कर्मचारी पाठवले आहेत. मार्शल'चा एक पॉईंट त्या ठिकाणी घेतोय. मार्शल'ने किती वेळा त्या ठिकाणी भेट दिली हे आपल्याला समजेल.'

- बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()