पुणे - सोने खरेदीबाबत नागरिक, बँक आणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेला विश्वास, गेल्या तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेल्या विविध घडामोडी आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित, पारंपरिकदृष्ट्या असलेले महत्त्व, यामुळे सोन्याला असलेली मागणी वाढतच आहे.
त्यामुळे गेल्या दोन वर्षांत सोन्याचा भाव २८ हजार रुपयांनी वाढला आहे. वस्तू महाग झाली की, त्याची मागणी काहीशी घटत असल्याचे अनेक सेवा, वस्तू किंवा उत्पादनांच्या बाबतीत घडते. मात्र सोन्याच्या भावाप्रमाणे त्याची मागणीदेखील वाढत आहे.