श्री नाथ म्हस्कोबाला ४३ तोळ्यांचा सुवर्णहार

सुवर्णहाराची मिरवणूक रथातून सकाळी एसटी स्टँडपासून सुरू करण्यात आली
श्री नाथ म्हस्कोबा
श्री नाथ म्हस्कोबाsakal media
Updated on

गराडे : श्री क्षेत्र कोडीत येथील श्री नाथ म्हस्कोबा देवस्थान व भाविकांच्या वतीने ४३ तोळ्यांचा सुवर्णहार बनविण्यात आला. तो सुवर्णहार श्रीनाथ म्हस्कोबा देवांना अर्पण करण्यात आला. या सोहळ्यास राज्यभरातून श्रीनाथ भक्त उपस्थित होते.

सुवर्णहाराची मिरवणूक रथातून सकाळी एसटी स्टँडपासून सुरू करण्यात आली. मिरवणूक नाथांचे देवघर व भैरवनाथ मंदिर येथे आल्यानंतर येथे मंदिर प्रदक्षिणा घालून नंदी चौकातून गावच्या माळावरील मुख्य म्हस्कोबा मंदिरात मिरवणूक गेली. या मिरवणुकीत महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.

यावेळी मंदिरामध्ये प्रवेश करून धूप आरती झाली. तसेच सुवर्णहाराची वाजत गाजत फुलांच्या पायघड्या घातलेल्या मार्गाने मंदिर प्रदक्षिणा झाली. वेळी ‘नाथ साहेबांचं चांगभलं’ गजर करीत फुलांची व गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर सर्व धार्मिक कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीनाथ महाराज महिला ग्रामसंघ यांच्या वतीने नाथ म्हस्कोबा मंदिरात फुलांची सजावट व रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रीनाथ सेवा युवक मंडळाने मिरवणुकीत आपले खेळ सादर केले. यावेळी देवस्थानचे पुजारी सोमनाथ बडदे, ईश्वर बडदे, शिवाजी बडदे, आकाश बडदे, गणेश बडदे यांनी मंदिरातील पूजेचे काम पाहिले. तसेच श्रीक्षेत्र कोडीत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा शांततेत व उत्साहात पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.